शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

... तर मोदींऐवजी प्रणव मुखर्जी होणार पंतप्रधान; RSS ची पर्यायी रणनीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 11:11 IST

निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास RSS प्रणव मुखर्जींना पंतप्रधान करु शकते- संजय राऊत

मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाला अपेक्षित यश मिळाले नाही तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) ऐनवेळी पंतप्रधानपदासाठी प्रणव मुखर्जी यांचे नाव पुढे करेल. जेणेकरून त्यांना सत्ता कायम राखता येईल. संघाने यादृष्टीने जुळवाजुळव सुरूही केली आहे, असा सनसनाटी दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला. 'एएनआय' वृत्तसंस्थेशी बोलताना संजय राऊत यांनी म्हटले की, आमच्या अंदाजानुसार RSS ने  गरज पडल्यास तर प्रणव मुखर्जी यांना पंतप्रधान करण्याची सर्व तयारी केली आहे. जर आगामी निवडणुकीत सत्तेपर्यंत पोहोचण्यासाठी भाजपाला अपेक्षित संख्याबळ जमवता आले नाही तर संघाकडून पंतप्रधानपदासाठी प्रणव मुखर्जींचे नाव पुढे केले जाईल. जेणेकरून त्यांना सत्ता कायम राखता येईल. मात्र, यंदाच्या निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत भाजपाला 110 जागा गमवाव्या लागतील, असे भाकीतही राऊत यांनी वर्तवले. संजय राऊत यांच्या या विधानामुळे आता राजकीय वर्तुळात काय प्रतिक्रिया उमटणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

यंदा नागपुरात झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष वर्गाच्या समारोप कार्यक्रमाला प्रणव मुखर्जी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावरून काँग्रेससह विरोधी पक्षातील नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. एकेकाळी काँग्रेसचे दिग्गज नेते राहिलेले मुखर्जी संघाच्या कार्यक्रमात येणार असल्याचे निश्चित झाल्यामुळे संपूर्ण देशाच्या राजकारणाचे लक्ष या कार्यक्रमाकडे होते.

टॅग्स :Pranab Mukherjeeप्रणव मुखर्जीSanjay Rautसंजय राऊतNarendra Modiनरेंद्र मोदीRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ