शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

दलितांच्या नाराजीचा धसका; संघाशी संबंधित संघटना आंबेडकर जयंती साजरी करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 09:30 IST

दलितांची नाराजी दूर करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयाने अॅट्रॉसिटी कायद्याबद्दल दिलेल्या निर्णयामुळे दलित संघटना नाराज आहेत. या निर्णयाविरोधात दलित संघटनांनी भारत बंदची हाकदेखील दिली होती. या पार्श्वभूमीवर दलितांची नाराजी दूर करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. याच प्रयत्नांचा भाग म्हणून आरएसएसने आपल्या संबंधित संघटनांना १४ एप्रिलला आंबेडकरांची जयंती साजरी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे १४ एप्रिलला विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.सर्वोच्च न्यायालयाने अॅट्रॉसिटी कायद्याबद्दल दिलेल्या निर्णयाचा मोठा फटका भाजपला बसू शकतो. न्यायालयाच्या निर्णयानंतर मोदी सरकार दलितविरोधी असल्याचा आरोप आणि प्रचार विरोधकांकडून सुरु झाला आहे. त्यामुळेच २ एप्रिलला दलित संघटनांनी भारत बंदची हाक दिली होती. यानंतर आरक्षण कायम ठेवले जाईल, अशी भूमिका भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी मांडली होती. दलित आणि आदिवासी यांच्या सुरक्षेसाठी असलेले कायदे अधिक मजबूत करु, असेही त्यांनी म्हटले होते. अॅट्रॉसिटीच्या मुद्यावर भाजपकडून डॅमेज कंट्रोल करण्याचे प्रयत्न केले जात असताना आता संघ आणि संघाशी संबंधित संघटना भाजपच्या मदतीला धावून आल्या आहेत. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाकडून आंबेडकर जयंती साजरी केली जाणार आहे. आंबेडकर जयंतीनिमित्त अनेक ठिकाणी बाईक रॅलीचे आयोजन केले जाणार आहे. 'समाज जातीच्या आधारे विभाजित होऊ नये, यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत. काहीजण हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्याविरोधात आमचा संघर्ष सुरु आहे,' असे विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय महामंत्री मिलिंद परांडे यांनी म्हटले.  

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघBJPभाजपाAtrocity Actअॅट्रॉसिटी कायदा