शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

म्हैस आणि जर्सी गायीच्या दुधामुळं गुन्हेगारीत वाढ होतेय; रा. स्व. संघ प्रचारकाचा जावईशोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2018 16:03 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका वरिष्ठ नेत्यानं वादग्रस्त विधान केलं आहे. म्हैस आणि जर्सी गायीच्या दुधाच्या सेवनामुळं गुन्हेगारी प्रवृत्तीमध्ये वाढ होत असल्याचा जावईशोध लावला आहे.

नवी दिल्ली - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका वरिष्ठ नेत्यानं वादग्रस्त विधान केलं आहे. म्हैस आणि जर्सी गायीच्या दुधाच्या सेवनामुळं गुन्हेगारी प्रवृत्तीमध्ये वाढ होत आहे. नवभारत टाइम्सच्या वृत्तानुसार आरएसएसचे वरिष्ठ प्रचारक शंकरलाल यांनी असा दावा केला आहे. भारतीय गायींच्या दुधामुळं सात्विक शक्ती मिळते. देशी गाईच्या पोटात चुकून विष जरी गेलं तरी ते विष गाईच्या दुध, गोमूत्र अथवा शेणामध्ये जात नाही. बायबल, कुराण यांच्यासह इतर धर्मग्रंथात गोमांस निषिद्ध मानलं गेलं आहे, असंही त्यांनी सांगितलं.

देशी गाईच्या दुधाचे सेवन केल्यामुळं गुन्हेगारी प्रवृत्ती कमी होतं असल्याचा दावाही त्यांनी केला. जर्सी गाईचं अथवा म्हशीचे दुध पिल्यानं रागाचं प्रमाण वाढतं आणि सहनशीलता संपते असे ते म्हणाले. पुढे बोलताना ते म्हणाले की,  भारतीय गायींची चमडी पातळ आसते. त्यांना खांदा असतो. पाय सरळ व मजबूत, पोळ खूपच लोंबती आणि शिस्न मध्यम आकाराचे असते.  तर जर्सी गाईंची चमडी ही जाडजूड असते. 

देशी गाईद्वारे गुन्हेगारमुक्त भारत ही कल्पाना आमंलात आणली जात असल्याचे आरएसएस प्रचारक शंकरलाल  यांनी सांगितले.  ते म्हणाले की, गाय प्रदुषण कमी करण्यातही मोलाची भुमिका बजावते. एक ग्राम तुपाचा दिवा लावल्यानं 100 किलो ऑक्सिजनची निर्मिती होते. जर तुपाचा दिवा तुळशीसमोर लावल्याने ओझोन गॅसचीही निर्मिती होतं असल्याचा दावा त्यांनी केला आहे. 

एखादी व्यक्ती आजारी असल्यास त्यांच्या समोर तूपचा दिवा लावल्यास ऑक्सिजनची कमी भासत नाही, असाही दावा शंकरलाल यांनी केला. एक एकर शेती आणि एका देशी गाईच्या मदतीनं 50 हजारांचं एका महिन्यात घेता येऊ शकतं. याबाबतचं प्रशिक्षण लोकांना दिलं जात असल्याची माहिती यावेळी शंकरलाल यांनी दिली. 31 मार्च रोजी संघातर्फे गौ जप महायज्ञचे आयोजन करण्यात आलं आहे.  

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ