शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

नेहरुंनी प्रजासत्ताक दिनाच्या संचलनासाठी स्वयंसेवकांना आमंत्रित केलं होतं- संघ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2018 14:00 IST

प्रणव मुखर्जींवरुन निर्माण झालेल्या वादावर संघाचं भाष्य

नवी दिल्ली: माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात सहभागी होऊन स्वयंसेवकांना संबोधित करणार आहेत. याबद्दल काँग्रेसमध्ये मोठी नाराजी आहे. मुखर्जींनी या कार्यक्रमाचं निमंत्रण का स्विकारलं, अशी जोरदार चर्चा सुरू असताना आता त्यात पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरुंचीही एन्ट्री झालीय. नेहरुंनी 1963 मध्ये संघाच्या 3 हजार स्वयंसेवकांना प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात सहभागी होण्याचं आमंत्रण दिलं होतं, असं संघानं म्हटलंय. नेहरु संघाच्या सामाजिक कार्यामुळे प्रभावित झाले होते, असं संघाच्या नॅशनल मीडिया टीमचे सदस्य रतन शारदा यांनी म्हटलंय. 1962 च्या युद्धावेळी संघाच्या कार्यकर्त्यांनी सीमेवर खूप काम केलं होतं, असं रतन शारदा म्हणाले. 'स्वयंसेवकांनी केलेल्या कामामुळे नेहरु खूप प्रभावित झाले होते. त्यामुळे 1963 च्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात त्यांनी संचलनासाठी संघाच्या स्वयंसेवकांना आमंत्रित केलं होतं. त्यांनी आणखी काही स्वयंसेवी आणि सामाजिक संस्थांनादेखील संचलनासाठी आमंत्रित केलं होतं. मात्र चीनविरुद्धच्या युद्धातील नेहरुंच्या भूमिकेवर अनेकजण नाराज होते. त्यामुळे त्यांनी संचलनात सहभागी होण्याचा निर्णय घेतला,' असं शारदा यांनी सांगितलं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात सहभागी घेतला होता, असं शारदा म्हणाले. 'आम्हाला संचलनाच्या काही आठवड्यांपूर्वीच आमंत्रण देण्यात आलं. मात्र आम्ही संचलनात सहभागी झालो,' असं शारदा म्हणाले. संघ मुख्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला प्रणव मुखर्जी उपस्थित राहणार आहेत. त्यावरुन त्यांच्यावर टीका होतेय. यावरही शारदा यांनी भाष्य केलं. मुखर्जींवरील टीका अनाठायी असल्याचं त्यांनी म्हटलंय.  

टॅग्स :Jawaharlal Nehruजवाहरलाल नेहरूPranab Mukherjeeप्रणव मुखर्जीRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघNarendra Modiनरेंद्र मोदी