शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

फक्त दलितांच्या घरी जेवू नका- मोहन भागवत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2018 15:36 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून भाजपाची कानउघाडणी

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाजपाच्या सर्व खासदारांना दलितांच्या घरी जाण्याच्या सूचना केल्या होत्या. यानंतर भाजपाचे अनेक खासदार दलितांच्या घरी जेवायला जाऊ लागले. भाजपाच्या या दलित प्रेमावर संघ नाराज असल्याचं दिसतंय. फक्त दलितांच्या घरी जाऊन आणि त्यांच्यासोबत जेवून काहीही होणार नाही, असं सरसंघचालक मोहन भागवतांनी म्हटलंय. दिल्लीत संघाची एक बैठक झाली. यात सरसंघचालक मोहन भागवत यांनी समरसता अभियानावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. 'आपण अष्टमीला दलित समाजातील मुलींना घरी बोलावतो. त्यांची पूजा करतो. मात्र आपण आपल्या मुलींना दलितांच्या घरी पाठवतो का?,' असा सवाल भागवत यांनी विचारला. 'ज्यावेळी दोन्ही बाजूंनी पुढाकार घेतला जाईल, तेव्हाच समरसता अभियान यशस्वी होईल. त्यामुळे केवळ दलितांच्या घरी जाऊन काहीही होणार नाही. दलितांचंही आपण आपल्या घरी स्वागत करायला हवं,' असं सरसंघचालकांनी म्हटलं. केवळ दलितांच्या घरी जाऊन त्यांच्या सोबत जेवून समरसता निर्माण होणार नाही, असं बैठकीला उपस्थित असलेले विश्व हिंदू परिषदेचे कार्यकारी अध्यक्ष आलोक कुमार यांनी म्हटलं. 'दलित समाजाच्या आर्थिक प्रगतीसाठी आणि प्रतिष्ठेसाठी काम करण्याची गरज आहे. आपण घरी गेलो म्हणून दलितांना धन्य वाटेल, अशी जर कोणाची समजूत असेल, तर तो त्यांचा फक्त अहंकार आहे. जर कोणी स्वत:ला थोर समजून इतरांना कमी लेखून त्याच्या घरी जेवायला जात असेल, तर याला समरसता म्हणता येणार नाही,' असं कुमार यांनी म्हटलं.  

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघBJPभाजपा