शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

 घटस्फोटाचे प्रमाण सुशिक्षित आणि संपन्न कुटुंबांमध्ये अधिक- मोहन भागवत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2020 11:02 IST

सरसंघचालक मोहन भागवत यांनी वाढत्या घटस्फोटाच्या प्रकरणांवर मतप्रदर्शन केलं आहे.

अहमदाबाद : सरसंघचालक मोहन भागवत यांनी वाढत्या घटस्फोटाच्या प्रकरणांवर मतप्रदर्शन केलं आहे. घटस्फोटाचे प्रमाण सुशिक्षित आणि संपन्न कुटुंबांमध्ये अधिक असल्याचं भागवतांनी अधोरेखित केलं आहे. शिक्षण आणि संपन्नतेसोबत अहंकारही येतो. त्या कारणास्तव कुटुंबं विभक्त होतात, असं मोहन भागवत म्हणाले आहेत. सरसंघचालक मोहन भागवत रविवारी संघाच्या स्वयंसेवकांशी अहमदाबादमध्ये बोलत होते.घटस्फोटाची प्रकरणे आजकाल मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. किरकोळ कारणांवरून जोडपी भांडतात. सुशिक्षित आणि संपन्न कुटुंबांमध्ये घटस्फोटाची प्रकरणे अधिक आढळतात. मी हिंदू आहे. सर्वधर्मीय श्रद्धांचा मी आदर करतो, मात्र माझ्या स्वत:च्या श्रद्धास्थानांबाबत मी आग्रही आहे. मला माझ्या कुटुंबाकडून संस्कार मिळाले आहेत आणि मातृशक्ती आम्हाला ते शिकवते, संघातील उपक्रमांबाबत स्वयंसेवकांनी आपल्या कुटुंबीयांनाही सांगावे, अशी आमची अपेक्षा आहे. कारण अनेकदा आपल्या कुटुंबातील महिलांना अधिक वेदनादायी कामं करावी लागतात. आपुलकीची भावना ही समाजाची ओळख आहे.2 हजार वर्षांपासून चालत आलेल्या परंपरेचं पालन करत असल्यानंच समाजात अशी परिस्थिती आहे. आपण महिलांना घरांपर्यंत मर्यादित ठेवलं आहे. अशी स्थिती 2 हजार वर्षांपूर्वी नव्हती. तो आपल्या समाजाचा सुवर्ण काळ आहे. हिंदू समाजानं सदगुणी आणि संघटित झालं पाहिजे. जेव्हा मी समाजासंदर्भात बोलतो तेव्हा फक्त ते पुरुषांसाठी नसतं. मी हिंदू आहे. मी सर्वच धर्मांच्या पवित्र स्थानांचा सन्मान करतो. परंतु मी आपल्या श्रद्धेच्या स्थानाप्रति कटिबद्ध आहे. मला हे संस्कार माझ्या कुटुंबीयांकडून मिळाले आहेत.मला मातृशक्तीनेच हे गुण शिकवले आहेत. कुटुंब आणि महिलेशिवाय समाज पूर्ण होत नाही. जी अर्ध्या समाजाचं नेतृत्व करते आणि त्याला शिक्षित करते. परंतु समाजाची आम्ही चिंता करत नाही. भारताकडे हिंदू समाजाशिवाय कोणताही पर्याय नाही. हिंदू समाजाकडेही परिवारासारखं व्यवहार करण्याशिवाय कोणताही पर्याय नसल्याचंही मोहन भागवतांनी स्पष्ट केलं आहे.  

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवत