शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

सरकारचं पाऊल डगमगल्यास संघ देणार सकारात्मक सल्ला- मोहन भागवत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2019 07:38 IST

लोकसभा निवडणुकीत भाजपानं देदीप्यमान यश मिळवलं.

नवी दिल्लीः लोकसभा निवडणुकीत भाजपानं देदीप्यमान यश मिळवलं. या यशाचं श्रेय कुठे तरी आरएसएसलाही दिलं जातंय. आता मोहन भागवत म्हणाले की, जर सरकारचं पाऊल डगमगत असल्याचं दिसल्यास संघाकडून त्यांना सकारात्मक दृष्टिकोन आणि योग्य सल्ला देण्यात येईल. कानपूरच्या पं. दीनदयाल उपाध्याय सनातन धर्म विद्यालयाच्या संघ शिक्षावर्गाला संबोधित करताना ते बोलत होते.जे लोकशाही व्यवस्थेतून निवडून येतात, त्यांच्याकडे भरपूर अधिकार असतात. त्याचा अर्थ असा नाही की, त्या अधिकारांचा गैरवापर केला जावा. जर कोणत्याही कारणास्तव सरकारचं पाऊल डगमगलं तर संघ त्यांना सकारात्मक सल्ला देईल. आपल्या माणसांबरोबर नेहमीच सकारात्मक भूमिका घेतली पाहिजे. जर कोणत्याही कारणास्तव निराशा असल्यास तसं सरकारनं आम्हाला सांगावं, असंही मोहन भागवत म्हणाले आहेत.  आम्ही संघाचं केंद्र नागपूरहून हलवून दिल्ली करू शकतो. परंतु असं न करणं केव्हाही चांगलंच राहील. स्वयंसेवकांना उद्देशून मोहन भागवत म्हणाले, कितीही चांगलं काम केलं असलं किंवा इतरांची मदत केली असली तरी कधीही कोणत्याही गोष्टीचा अहंकाराला बाळगू नका. इतरांना उपकाराच्या भावनेनं मदत करण्याची प्रवृत्ती प्रत्येकामध्ये असली पाहिजे. संघाच्या कार्यांचा विस्तार झाला असून, स्वयंसेवकांचा मानही आता वाढला आहे, हे ऐकून फारच आनंद झाला. संघप्रमुख मोहन भागवत शनिवारीच कानपूरला आले आहेत. ते संघाकडून 24 मे ते 13 जूनपर्यंत चालणाऱ्या प्रशिक्षण शिबिराला उपस्थिती दर्शवण्यासाठी पोहोचले होते. 

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवत