शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीत RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची मुस्लीम धर्मगुरू, इमाम यांच्यासोबत महत्त्वाची बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 11:14 IST

याआधी सप्टेंबर २०२२ मध्येही मोहन भागवत यांनी मुस्लीम समाजातील लोकांसोबत चर्चा केली होती. 

नवी दिल्ली - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत दिल्लीतील हरियाणा भवन येथे एक बैठक घेत आहेत. या बैठकीबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. कारण ही बैठक मुस्लीम धर्मातील नेत्यांसोबत होत आहे. या बैठकीला ऑल इंडिया इमाम संघटनेचे प्रमुख उमर अहमद इलियासीसह मुस्लीमांचे अनेक धर्मगुरू सहभागी होणार आहेत. त्याशिवाय संघाचे ज्येष्ठ नेते दत्तात्रय होसाबळे, कृष्ण गोपाळ, रामलाल आणि इंद्रेश कुमारही बैठकीत हजर असणार आहेत. 

एका रिपोर्टनुसार,  ही बैठक संघाच्या मुस्लीम समाजापासून संवाद वाढवण्याच्या प्रयत्नांचा एक भाग मानली जाते. आरएसएसशी निगडीत मुस्लीम राष्ट्रीय मंचाकडून सातत्याने मुस्लिम समाजातील अभ्यासक, धर्मगुरू आणि इतर प्रतिष्ठित चेहऱ्यांसोबत संवाद वाढवला जात आहे. २०२३ मध्ये या मंचाकडून एक राष्ट्र, एक ध्वज, एक राष्ट्रगीत या भावनेतून अल्पसंख्याक समुदायाशी संवाद साधण्यासाठी राष्ट्रव्यापी अभियान सुरू करण्याची घोषणा केली होती. याआधी सप्टेंबर २०२२ मध्येही मोहन भागवत यांनी मुस्लीम समाजातील लोकांसोबत चर्चा केली होती. 

ऑक्टोबर २०२२ मध्ये संघाचे नेते इंद्रेश कुमार यांनी दिल्लीतील हजरत निजामुद्दीन दर्ग्याला भेट दिली होती. तिथे दर्गा परिसरात दिवे पेटवण्यात आले होते. त्यावेळी ते म्हणाले होते की, कुणीही जबरदस्तीने धर्म परिवर्तन अथवा हिंसाचार करू नये. सर्वांना आपापल्या धर्माचे पालन करण्याचे स्वातंत्र्य आहे आणि सर्वांनी धर्मांचा सन्मान ठेवणे गरजेचे आहे असं त्यांनी सांगितले होते. इतकेच नाही तर सप्टेंबर २०२२ मध्ये मोहन भागवत यांनीही ऑल इंडिया इमाम संघटनेचे प्रमुख उमर अहमद इलियासी यांची भेट घेतली होती. त्याचवेळी एका मशि‍दीचा आणि मदरशाचा दौरा त्यांनी केला होता. या सर्व प्रयत्नांना धार्मिक सुसंवादासाठी उचललेले पाऊल मानले जात होते. 

दरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्यांच्या स्थापनेचा शताब्दी वर्ष साजरे करत आहे. ज्या अंतर्गत ते भारतातील प्रत्येक गावात, शहरात, घराघरात पोहचण्याचा प्रयत्न करत आहेत. आज दिल्लीतील हरियाणा भवन इथं संघाचे सरसंघचालक मोहन भागवत मुस्लीम धर्मगुरूंसोबत बैठक घेत आहेत. विविध समुदायांमध्ये संवाद वाढवणे आणि सामाजिक एकता मजबूत करणे हा त्यामागचा उद्देश आहे. शताब्दी वर्षात देशातील प्रत्येक भागात आपली विचारधारा आणि सेवा कार्य पसरवण्याचा प्रयत्न संघ करत आहे. ही बैठक याच दृष्टीने महत्त्वाची मानली जाते जिथे विविध धर्मातील लोकांसोबत सुसंवाद साधण्याचा, सहकार्य करण्याचा भाग आहे.  

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघMuslimमुस्लीमMohan Bhagwatमोहन भागवत