शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

मोहन भागवतांनी दिली हिंदू धर्म सोडून गेलेल्यांना पुन्हा हिंदू धर्मात आणण्याची शपथ, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2021 17:50 IST

भय अधिक काळ बांधून ठेऊ शकत नाही. अहंकारामुळे एकता संपुष्टात येते. आपण लोकांना जोडण्याचे काम करू, असेही मोहन भागवत म्हणाले.

 चित्रकूट येथे सुरू असलेल्या तीन दिवसीय हिंदू एकता महाकुंभमध्ये, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी हिंदू धर्म सोडून गेलेल्यांची घरवापसी करण्याचे आवाहन केले. याचवेळी, भय अधिक काळ बांधून ठेऊ शकत नाही. अहंकारामुळे एकता संपुष्टात येते. आपण लोकांना जोडण्याचे काम करू, असेही मोहन भागवत म्हणाले. यावेळी त्यांनी महाकुंभमध्ये उपस्थित असलेल्यांना याचा संकल्पही दिला.

लोक शपथ घेत मोहन भागवतांसोबत म्हणाले, 'मी हिन्दू संस्कृतीचा धर्मयोद्धा, मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री राम यांच्या संकल्प स्थळावर सर्वशक्तिमान परमेश्वराला साक्षी माणून शपथ घेतो की, मी आपला पवित्र हिन्दू धर्म, हिन्दू संस्कृती आणि हिन्दू समाजाचे संरक्षण, संवर्धन आणि सुरक्षिततेसाठी आजीवन कार्य करेल. मी प्रतिज्ञा करतो, की कुण्याही हिंदू बंधूला धर्मातून बाहेर जाऊ देणार नाही. तसेच जे बंधू धर्म सोडून गेले आहेत, त्यांच्याही घरवापसीसाठी कार्य करेन. त्यांना कुटुंबाचा भाग बनवेन. मी प्रतिज्ञा करतो की, हिंदू बहिणींची अस्मिता, सन्मान आणि शीलाचे रक्षण करण्यासाठी सर्वस्व अर्पण करेन. जाती, वर्ग, भाषा आणि पंथ भेद सोडून हिंदू समाजाला समरस, सशक्त आणि अभेद्य बनविण्यासाठी संपूर्ण शक्तीनिशी कार्य करेन.' 

विशेष म्हणजे, चित्रकूटमधील या हिंदू महाकुंभाची सुरुवात मंगळवारी 1100 शंखांच्या शंख नादाने झाली. या महाकुंभात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्याशिवाय देशातील अनेक दिग्गज लोक उपस्थित आहेत. तुलसीपीठाधीश्‍वर श्री रामभद्राचार्य महाकुंभाचे आयोजन करत आहेत. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही उपस्थित राहणार आहेत. श्री श्री रविशंकर यांनीही कार्यक्रमाला संबोधित केले. काही लोक जमले, की भीती वाटते. मात्र, जेथे संत आणि हिंदू एकत्रित येतात, तिथे अभय असते. याच बरोबर, देशभक्ती आणि ईश्वर भक्ती एकच आहे. जो देशभक्त नाही, तो ईश्वर भक्तही होऊ शकत नाही, असेही रविशंकर यावेळी म्हणाले. 

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघHinduismहिंदुइझम