शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

भागवतांना RSS आणि भारतीय सैन्याची तुलना करायची नव्हती- संघ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2018 09:34 IST

​​​​​​​​​​मोहन भागवत यांना केवळ RSS किती शिस्तबद्ध संघटना आहे, हे अधोरेखित करायचे होते.

मुंबई: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अवघ्या तीन दिवसांमध्ये सैन्याची उभारणी करू शकतो, हे वक्तव्य करताना सरसंघचालक मोहन भागवत यांना कोणत्याही प्रकारे RSS आणि भारतीय सैन्याची तुलना करायची नव्हती, असे स्पष्टीकरण संघाकडून देण्यात आले आहे. मोहन भागवत यांना केवळ RSS किती शिस्तबद्ध संघटना आहे, हे अधोरेखित करायचे होते. त्यांचा विधानाचा अर्थ असा होता की, सैन्याने सामान्य लष्करातून जवानांची निवड केल्यास त्यांना प्रशिक्षण करण्यासाठी सहा ते सात महिन्यांचा कालावधी लागेल. याउलट RSS चे स्वयंसेवक अवघ्या तीन दिवसांत प्रशिक्षित होऊ शकतात, असे RSS चे अखिल भारतीय प्रचारक मनमोहन वैद्य यांनी सांगितले. 

मोहन भागवत यांनी रविवारी मुजफ्फरपूर येथे संघाच्या कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी त्यांनी म्हटले होते की, आमची सैन्य तयार करण्याची क्षमता आहे. पण ही आमची लष्करी संघटना नाही. तर ही कौटुंबीक संघटना आहे. पण संघात लष्करासारखीच शिस्त आहे. देशाला गरज असेल आणि संविधानाने परवानगी दिली तर आम्ही सीमेवर लढायला तयार आहोत. संघ स्वयंसेवक हसतहसत बलिदान द्यायला तयार आहेत, असे भागवत यांनी सांगितले. 

देशातील आपत्तीच्यावेळी संघ स्वयंसेवक नेहमीच तत्पर असतात. भारत-चीन युद्धाच्यावेळी स्वयंसेवक सीमेवर पाय रोवून उभे राहिले. स्वंयसेवकांनी चीनच्या सैनिकांचा मुकाबला केला. स्वयंसेवकांनी जर मनात आणलं तर आताही चीनच्या सैनिकांना भारतात घुसखोरी करणं कठीण होईल, असा दावाही भागवतांनी केला होता. 

मात्र, त्यांच्या या वक्तव्यावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली होती. भागवत यांचे वक्तव्य लष्कराचे खच्चीकरण करणारे असून हा लष्कराचा अपमान आहे. त्याबद्दल भागवत यांनी माफी मागायला हवी, अशी मागणी राष्ट्रीय जनता दलाचे राज्य प्रवक्ते मृत्युंजय तिवारी यांनी केली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी मोहन भागवत यांनी भारतीय सैन्याचा अपमान केल्याचा आरोप केला. भारतीय सैन्याच्या क्षमतेवर अशाप्रकारे प्रश्नचिन्ह उपस्थित करणे योग्य नाही. याबद्दल संघाने भारतीय लष्कराची माफी मागितली पाहिजे, असे नवाब मलिक यांनी म्हटले.

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघMohan Bhagwatमोहन भागवतIndian Armyभारतीय जवान