शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

बांगलादेश ते बंगालपर्यंत..., संघाच्या समन्वय बैठकीत या मुद्यांवर होणार चर्चा! केरळमध्ये 3 दिवस चालणार महामंथन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2024 15:33 IST

बैठकीच्या सुरुवातीला वायनाडमध्ये नुकत्याच झालेल्या भूस्खलनासंदर्भातील माहिती आणि स्वयंसेवकांनी केलेल्या सेवा कार्याची माहिती सर्व प्रतिनिधींना देण्यात आली. या बैठकीत विविध संघटनांचे कार्यकर्ते कामाची माहिती आणि अनुभवांचे आदान-प्रदान करतील.

केरळमधील पलक्कडमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तीन दिवसीय समन्वय बैठकीला सुरुवात झाली आहे. शनिवारी (31 ऑगस्ट) सरसंघचालक मोहन भागवत यांनी दीप प्रज्वलन करून बैठकीचा शुभारंभ केला. या बैठकीला सर्व 32 संलग्न संघटनांचे पदाधिकारी उपस्थित आहेत. संघप्रमुख मोहन भागवत यांच्यासह सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे व्यासपीठावर उपस्थित होते.

बैठकीच्या सुरुवातीला वायनाडमध्ये नुकत्याच झालेल्या भूस्खलनासंदर्भातील माहिती आणि स्वयंसेवकांनी केलेल्या सेवा कार्याची माहिती सर्व प्रतिनिधींना देण्यात आली. या बैठकीत विविध संघटनांचे कार्यकर्ते कामाची माहिती आणि अनुभवांचे आदान-प्रदान करतील.

या विषयांवर होऊ शकते चर्चा -या समन्वय बैठकीत राष्ट्रीय मुद्यांबरोबरच पश्चिम बंगाल सारख्या अनेक राज्यांतील महत्वाच्या विषयांवर चर्चा होऊ शकते. या बैठकीला भाजपाध्यक्ष जेपी नड्डा आणि सरचिटणीस बी.एल.संतोषही उपस्थित राहतील. मोदी सरकार 3.0 च्या स्थापनेनंतर संघाची ही पहिलीच समन्वय बैठक आहे. या बैठकीत विविध विषयांवर परस्पर सहकार्य आणि समन्वय वाढविण्यासंदर्भात आवश्यक उपाय योजनांवरही चर्चा केली जाईल.

काय म्हणाले प्रचार प्रमुख? - प्रचार प्रमुख सुनील आंबेडकर म्हणाले, "आम्ही केरळमध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारची बैठक घेत आहोत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 90 सदस्यांसह 32 संघटनांचे 320 सदस्य या बैठकीत विचारविनिमय करतील. आम्ही निमंत्रितांकडून (राष्ट्रीय अध्यक्ष, संस्थेचे सचिव, पदाधिकारी) फीडबॅक घेऊ आणि जमिनीवरील परिस्थितीवर चर्चा करू. प्रत्येक संस्था त्या-त्या क्षेत्रातील अनुभव, त्यांनी उपस्थित केलेले मुद्दे आणि त्यांच्या निरीक्षणांचे आदान प्रदानही करतील."

आंबेकर पुढे म्हणाले, "राष्ट्राच्या दृष्टीने महत्वाचे मुद्दे, राष्ट्रीय सुरक्षा, वर्तमान काळातील मुद्दे, घटना घडामोडी, काही राज्यांचे मुद्दे, काही राज्यातील चिंताजनक मुद्दे आदींवर चर्चा केली जाईल. समन्वय आणखी चांगला कशा प्रकारे करता येईल यावरही चर्चा होईल. तीन दिवसांत अेक सत्र होतील." या शिवाय, "आम्ही 2025 विजयादशमी ते 2026 विजयादशमी पर्यंत शताब्दी वर्ष साजरे करणार आहोत, याअंतर्गत आम्ही मोठ्या प्रमाणावर सामाजिक परिवर्तनाचे मुद्दे मांडणार आहोत. पंच परिवर्तनावर काम केले जाईल. यात, सामाजिक समरसता, कुंटुंब जागरण, पर्यावरणविषयक समस्या, आत्मसन्मान आणि नागरी कर्तव्य यांचा समावेश असेल. विजयादशमी 2025 रोजी हे पाचही उपक्रम आरएसएसकडून मोठ्या प्रमाणावर सुरू केले जातील," असेही ते म्हणाले.

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघKeralaकेरळMohan Bhagwatमोहन भागवतJ P Naddaजगत प्रकाश नड्डा