शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

माझ्याविरोधात RSS आणि भाजपाचा कट, पण मी घाबरणार नाही- लालू

By admin | Updated: July 7, 2017 13:59 IST

केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागा(सीबीआय)नं राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांच्यावर बेनामी अ‍ॅक्टअंतर्गत कारवाई केली

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 7 - केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागा(सीबीआय)नं राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांच्यावर बेनामी अ‍ॅक्टअंतर्गत कारवाई केली आहे. या कारवाईनंतर लालूप्रसाद यादव यांनी भाजपा आणि आरएसएसवर निशाणा साधला आहे. भाजपानं माझ्याविरोधात कट रचला आहे, पण तरीही मी घाबरणार नाही, असं लालूप्रसाद यादव म्हणाले आहेत. लालूप्रसाद यादव यांनी मोदी सरकारवर पलटवार केला आहे. मला आणि माझ्या कुटुंबीयांना विनाकारण लक्ष्य केलं जातंय. भाजपा आणि आरएसएस मला बदनाम करण्याचा कट रचतायत. दबाव टाकून भाजपाला मला झुकवायचं आहे. मात्र मी कधीही कोणासमोर झुकणार नाही आणि मी यांना घाबरणारसुद्धा नाही. आम्ही मातीमोल झालो तरी चालेल, मात्र भाजपा सरकारला सत्तेपासून दूर केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. बेनामी संपत्तीवर लालू म्हणाले, मी कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार केला नाही. 2006च्या रेल्वे कॅटरिंगच्या टेंडर प्रकरणात सीबीआयनं लालूप्रसाद यादवांसमवेत राबडी देवी, तेजस्वी यादव, सरला गुप्ता, आयआरसीटीसीचे तत्कालीन एमडी पी. के. गोयल, विजय कोचर, विनय कोचर यांच्यावर कलम 420 आणि 120 ब अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. लालू यांनी रेल्वेमंत्रिपदाच्या कार्यकाळात 32 कोटींची जमीन जवळपास 65 लाख रुपयांना विकली होती. तसेच या व्यवहाराच्या माध्यमातून त्यांनी स्वतःच्या खासगी कंपन्यांना फायदा पोहोचवला होता.

आणखी वाचा
सीबीआयने लालू आणि अन्य आरोपींशी संबंधित असणा-या 12 ठिकाणांवर छापेमारीची कारवाई केली. लालू रेल्वेमंत्री असताना त्यांनी आपल्या अधिकाराचा उपयोग करून भारतीय रेल्वे कॅटरींग अँड टुरिजम कॉर्पोरेशन म्हणजे आयआरसीटीसीच्या माध्यमातून खासगी हॉटेल कंपन्यांना बेकायदा लाभ पोहोचवल्याचा आरोप आहे. लालू काँग्रेस प्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या कार्यकाळात 2004 ते 2009 दरम्यान देशाचे रेल्वेमंत्री होते. लालू प्रसाद यादव यांनी हॉटेल भाडेपट्टयावर देण्याच्या मोबदल्यात जमीन घेतली, असा आरोप सीबीआयने केला आहे. दरम्यान सीबीआयने एफआयआर नोंदवल्यानंतर लालू प्रसाद यादव यांच्या पाटणा 10 सर्क्युलर रोड निवासस्थानी बंदोबस्तात वाढवण्यात आला आहे.