शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

सदस्यांना निरोप देताना राज्यसभेत मोदी झाले भावुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2021 06:48 IST

गुलाम नबी आझाद, शमशेर सिंह यांच्यासह चौघांना निरोप

नवी दिल्ली : राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांच्यासह चार सदस्यांचा कालावधी पूर्ण झाल्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी, सभापती एम. व्यंकय्या नायडू आणि सभागृहाच्या सदस्यांनी भावी जीवनासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. राजकीय जीवन आणि सभागृहातील अनुभव या आधारावर ते जनकल्याण आणि देशाच्या विकासासाठी आपले योगदान देत राहतील, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली. आझाद यांच्यासोबत भाजपचे शमशेर सिंह मन्हास, पीडीपीचे मीर मोहम्मद फय्याज व नजीर अहमद लवाय यांचा कार्यकाळही समाप्त होत आहे. यावेळी मोदी आणि गुलाम नबी आझादही काही क्षणांसाठी भावूक झाले होते. आझाद यांच्यासोबतच्या आपल्या जुन्या मैत्रीचा उल्लेख करून मोदी म्हणाले की, आझाद असे नेते आहेत जे आपल्या पक्षासह सभागृह आणि देशाची काळजी करत असतात. दोन्ही सभागृहांतील आझाद यांच्या कार्याचा उल्लेख करून मोदी म्हणाले की, त्यांची विनम्रता, शांतता आणि देशासाठी काही करण्याची इच्छा कौतुकास्पद आहे. आझाद यांची ही कटिबद्धता त्यांना आगामी काळातही शांत बसू देणार नाही. त्यांचा अनुभवाचा देशाला लाभ होत राहील.  मोदी म्हणाले की, आझाद हे जेव्हा काश्मीरचे मुख्यमंत्री होते, तेव्हा आपण गुजरातचे मुख्यमंत्री होतो. त्यावेळी काश्मिरात अतिरेक्यांनी हल्ला केला होता. यात गुजरातचे काही पर्यटक मारले गेले होते. आझाद यांनी फोन करून आपल्याला याची माहिती दिली. कुटुंबातील सदस्यांप्रमाणे आझाद यांनी गुजरातच्या त्या लोकांची काळजी घेतली.  यावेळी पंतप्रधान अतिशय भावूक झाले. त्यानंतरच्या भाषणात आझाद यांनाही आपले अश्रू आवरणे कठीण झाले. आझाद यांनी सांगितले की, त्यावेळी घटनेनंतर आपण विमानतळावर गेलो तेव्हा पीडित कुटुंबातील मुले माझ्याजवळ येऊन खूप रडले. हे दृश्य पाहून माझ्या तोंडून शद्ब निघाले की, या देशातून दहशतवाद समाप्त व्हायला हवा. आठवलेंनी दिली आझाद यांना ऑफर केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी खास शैलीत आझाद यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की, काँग्रेस तुम्हाला पुन्हा राज्यसभेवर संधी देणार नसेल तर आम्ही तयार आहोत. हे ऐकून आझाद यांना हसू आलं. हिंदुस्थानी मुस्लिम असल्याचा अभिमान गुलाम नबी आझाद म्हणाले की, मी नशिबवान आहे की, कधी पाकिस्तानात गेलो नाही. पण, मी जेव्हा तेथील परिस्थितीबाबत वाचतो, ऐकतो तेव्हा मला याचा अभिमान होतो की, आम्ही हिंदुस्थानी मुस्लिम आहोत. जगात जर कुणा मुस्लिमांना अभिमान असायला हवा, तर तो हिंदुस्थानी मुस्लिमांना असायला हवा. पाकिस्तानचा उल्लेख करून ते म्हणाले की, तिथे ज्या सामाजिक समस्या आहेत, त्या भारतात नाहीत. मी अशी प्रार्थना करतो की, या देशातून दहशतवाद समाप्त व्हावा. काश्मिरी पंडितांचा उल्लेख करून ते म्हणाले की, मी जेव्हा विद्यार्थीदशेत राजकारणात होतो, तेव्हा मला सर्वाधिक मते काश्मिरी पंडितांचीच मिळत होती. काश्मिरी पंडितांना पुन्हा उभे करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी मोदी आणि शहा यांना केले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीGhulam Nabi Azadगुलाम नबी आझाद