शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

८५४ कोटी रूपये, 1BHK घर अन् ८४ बँक खाती; बंगळुरूत सायबर गुन्ह्याची धक्कादायक कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2023 15:10 IST

बंगळुरू पोलिसांनी धक्कादायक सायबर गुन्ह्याचा पदार्फाश केला आहे.

बंगळुरू : बंगळुरू पोलिसांनी एका मोठ्या आणि धक्कादायक सायबर गुन्ह्याचा पदार्फाश केला आहे. तब्बल ८५४ कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले असले तरी भय इथेच संपत नाही. कारण गुंतवणुकीच्या नावाखाली पैसे ओतलेल्या नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. फसवणूक करणार्‍यांच्या टोळीने पीडितांना व्हॉट्सॲप आणि टेलिग्रामद्वारे आमिष दाखवले. ही टोळी बंगळुरूच्या यालाहंका परिसरात 1 BHK भाड्याच्या घरातून हा कारभार सांभाळत होती. यासह आरोपी आठ मोबाईल फोन आणि ८४ बँक खाती वापरत होते.

दरम्यान, गुंतवणूक योजनेच्या बहाण्याने भारतातील हजारो नागरिकांची फसवणूक करणाऱ्या सहा जणांना अटक करण्यात आली आहे. फसवणूक झालेल्या एकूण रकमेपैकी पाच कोटी रुपये गोठवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. खरं तर अटक करण्यात आलेल्या सहा जणांपैकी ३३ वर्षीय एमबीए पदवीधर आणि ३६ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर यांनी दोन वर्षांपूर्वी यालाहंका परिसरातील एका घरातून खासगी उपक्रम सुरू केला होता.

गुंतवणूक योजनेच्या बहाण्याने फसवणूक सुरुवातीला नफा म्हणून दररोज १ ते ५ हजार रुपये मिळतील या बहाण्याने आरोपींनी १,००० रुपये ते १०,००० रुपयांपर्यंतची छोटी गुंतवणूक करण्यास सांगितली, अशी माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली. हजारो पीडितांनी १ लाख ते १० लाख किंवा त्याहून अधिक रकमेची गुंतवणूक केली, असेही त्यांनी सांगितले. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागरिकांनी गुंतवणूक म्हणून दिलेले पैसे आरोपींनी ऑनलाइन पेमेंटद्वारे वेगवेगळ्या बँक खात्यात टाकले. तसेच गुंतवणुकीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधितांनी जेव्हा रक्कम काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना कधीही परतावा मिळाला नाही. रक्कम जमा केल्यानंतर आरोपींनी पैसे मनी लाँड्रिंगशी संबंधित खात्यात वळवून आपला खिसा भरण्याचा प्रयत्न केला. एकूण ८५४ कोटींची रक्कम विविध ऑनलाइन पेमेंट ॲपवर टाकण्यात आल्याचे उघड झाले आहे. 

टॅग्स :Bengaluruबेंगळूरcyber crimeसायबर क्राइमfraudधोकेबाजीArrestअटकPoliceपोलिस