शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्याच्या खात्यात १०,०१,३५,६०,१३,९५,००० रुपये; बँकेकडून अकाउंट फ्रीज, सायबर सेलमध्येही तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 06:48 IST

हाथरस : उत्तरप प्रदेशातील हाथरसच्या  मधील  एका शेतकऱ्याच्या बँक खात्यात अचानक अब्जावधी रुपये आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सादाबाद ...

हाथरस : उत्तरप प्रदेशातील हाथरसच्या  मधील  एका शेतकऱ्याच्या बँक खात्यात अचानक अब्जावधी रुपये आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सादाबाद तालुक्यातील नगला दुर्जिया गावातील शेतकऱ्याच्या खात्यात १० नील १ खरब ३५ अब्ज ६० कोटी १३ लाख ९५ हजार रुपये जमा झाले. इतकी मोठी रक्कम पाहून शेतकऱ्याला धक्काच बसला. त्याने घाईघाईत या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली. 

आता शेतकऱ्याचे खाते फ्रीज करून हा प्रकार नेमका कशामुळे घडला, याचा तपास सुरू आहे. एवढी मोठी रक्कम नेमकी कशी आली हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. तांत्रिक चुकीमुळे हे घडले की सायबर चोरट्यांंनी हे केले, याचा तपास सुरू आहे. (वृत्तसंस्था)

नेमके काय घडले? तांत्रिक चुकीमुळे की सायबर फसवणूक?

नगला दुर्जिया गावातील शेतकरी अजित सिंह यांच्या बाबतीत हा प्रकार घडला. अजितसिंह यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, २४ एप्रिल रोजी त्यांच्या एअरटेल पेमेंट बँकेच्या खात्यातून १८०० रुपये गायब झाले होते. त्यामुळे ते चिंतेत होते. पण दुसऱ्या दिवशी २५ एप्रिल रोजी बॅलन्स तपासला तेव्हा त्याचे डोळे विस्फारले. खात्यात १०,०१,३५,६०,१३,९५,००० इतके रुपये जमा झाले होते. यावर त्यांचा विश्वास बसला नाही. 

अजित सिंह यांनी याची माहिती मई पोलिस ठाण्यात दिली. अजित सिंह यांच्या मते हा प्रकार कुणीतरी सायबर गुन्हेगाराने केला असावा.  त्यांच्या खात्यातून पैसे आधी कापले गेले आणि नंतर दुसऱ्याच दिवशी मोठी रक्कम जमा करण्यात आली. हे सर्व त्यांना फसवण्यासाठी केले जात आहे, असा त्यांचा आरोप आहे. त्यांनी या प्रकाराची तक्रार एअरटेल पेमेंट बँकेच्या कस्टमर केअरवर केली आहे. एअरटेल पेमेंट बँकेने सध्या त्यांचे खाते फ्रीज केले आहे. तांत्रिक चुकीमुळे हे घडले का, याचा तपास केला जाणार आहे. अजित सिंह यांनी सायबर सेलमध्येही ऑनलाइन तक्रार केली आहे. 

टॅग्स :FarmerशेतकरीAirtelएअरटेल