शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
4
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
5
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
6
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
7
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
8
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
9
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
10
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
11
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?
12
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
13
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
14
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
15
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
16
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
17
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
18
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
19
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
20
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच

पश्चिम बंगालला १००० कोटींची मदत; हवाई पाहणीनंतर पंतप्रधान मोदी यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2020 05:56 IST

एकीकडे कोरोनाचा सामना करीत असताना नैसर्गिक संकटाला सामोरे जाणाऱ्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या प्रयत्नांचे मोदी यांनी कौतुक केले.

बशीरहाट : चक्रीवादळामुळे मोठे नुकसान झालेल्या पश्चिम बंगालसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १००० कोटी रुपयांची अंतरिम मदत जाहीर केली आहे. अ‍ॅम्फन चक्रीवादळाने राज्यात ८० जणांचा मृत्यू झाला आहे. राजधानी कोलकातासह दक्षिण भागातील अनेक जिल्ह्यांमध्ये मोठे नुकसान झाले आहे. मोदी यांनी राज्यपाल जगदीप धनखड आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासोबत चक्रीवादळामुळे प्रभावित झालेल्या भागाची हवाई पाहणी केली, तर या राज्याच्या पाहणीसाठी आता केंद्रीय पथक जाणार आहे.उत्तर २४ परगणा जिल्ह्याच्या बशीरहाटमध्ये धनखड, ममता बॅनर्जी आणि राज्याचे प्रमुख अधिकारी यांच्यासह एका बैठकीत मोदी यांनी मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाख रुपये आणि जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली.एकीकडे कोरोनाचा सामना करीत असताना नैसर्गिक संकटाला सामोरे जाणाऱ्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या प्रयत्नांचे मोदी यांनी कौतुक केले.मोदी यांनी व्हिडिओ संदेशात म्हटले आहे की, राज्याला १००० कोटी रुपये देण्याची घोषणा करीत आहे. याशिवाय कृषी, वीज आणि अन्य क्षेत्रातील नुकसानीची महिती घेतली जाईल. उत्तर व दक्षिण परगणा, पूर्व आणि पश्चिम मिदनापूर, कोलकाता, हावडा आणि हुगली जिल्ह्यात सार्वजनिक आणि खासगी संपत्तीचे मोठे नुकसान झाले आहे. मोदी म्हणाले की, राज्यातील नुकसानीची माहिती घेण्यासाठी केंद्र एक पथक तैनात करील. यावेळी केंद्रीय मंत्री बाबूल सुप्रियो, देबश्री चौधरी, प्रतापचंद्र सारंगी आणि धर्मेंद्र प्रधान यांची उपस्थिती होती.500 कोटी रुपये ओडिशाला केंद्राकडून जाहीरभुवनेश्वर : अ‍ॅम्फन वादळाचा मोठा फटका बसलेल्या ओडिशा राज्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी ५०० कोटी रुपयांचे आगाऊ आर्थिक साह्य जाहीर केले. वादळाचा फटका बसलेल्या भागाची मोदी यांनी हवाई पाहणी केल्यानंतर त्यांनी राज्यपाल गणेशी लाल आणि मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांची बैठक घेतली, त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली. दीर्घकाळ चालणाºया पुनर्वसन उपाययोजनांसाठी आणखी मदत राज्य सरकारकडून अहवाल आल्यानंतर जाहीर केली जाईल, असे मोदी म्हणाले.

टॅग्स :Cyclone Amphanअम्फान चक्रीवादळNarendra Modiनरेंद्र मोदीMamata Banerjeeममता बॅनर्जी