शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

 विमान अपहरणाची धमकी देणाऱ्या अब्जाधीश प्रियकराला प्रेयसीसाठी सुरू करायची होती 'रॉयल एअरलाइन्स'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2017 16:22 IST

जेट एअरवेजच्या विमानात बॉम्ब ठेवल्याचे सांगून विमान अपहरणाची धमकी देणाऱ्या बिरजू सल्ला याच्या चौकशीमधून अनेक खुलासे होत आहेत.

नवी दिल्ली - जेट एअरवेजच्या विमानात बॉम्ब ठेवल्याचे सांगून विमान अपहरणाची धमकी देणाऱ्या बिरजू सल्ला याच्या चौकशीमधून अनेक खुलासे होत आहेत. गुजरातमधील अब्जाधीश जवाहिर असणाऱ्या बिरजू याला विमान कंपनीत काम करत असलेल्या प्रेससीसाठी रॉयल एअरलाइन्स सुरू करायची होती. 37 वर्षीय बिरजू सल्ला याची सध्या अहमदाबाद येथे क्राइम ब्रँचकडून चौकशी सुरू आहे. त्यावेळी बिरजू याने आपल्याला विमान कंपनीत काम करत असलेल्या प्रेससीसाठी विमान कंपनी सुरू करायची असल्याचे सांगितले. बिरजू याला याआधीही यावर्षीच्या जुलै महिन्यात विमान अपहरणविरोधी कायद्यांतर्गत अटक करण्यात आली होती. विशेष म्हणजे नागरी विमान वाहतूकमंत्री अशोक गजपती राजू यांनी सांगितले होते की, या व्यक्तीला ‘नो फ्लाय’ श्रेणीत टाकण्यात यावे.   मुंबईहून दिल्लीला जाणारे जेट एअरवेजचे विमान रविवारी पहाटे अपहरण आणि बॉम्बच्या धमकीनंतर तातडीने अहमदाबाद येथे विमानतळावर उतरविण्यात आले होते. या विमानात ११५ प्रवासी व चालक दलाचे ७ कर्मचारी होते. विमानाच्या स्वच्छतागृहात उर्दू व इंग्रजीत लिहिलेली एक चिठ्ठी मिळाली. ‘विमानात १२ अपहरणकर्ते आहेत व विमानाच्या सामान ठेवण्याच्या जागेत बॉम्ब ठेवले आहेत. विमान कुठेही न थांबविता थेट पाकव्याप्त काश्मीरमध्ये घेऊन जावे, अन्यथा बॉम्बचो स्फोट केले जातील,’ अशी धमकी त्या चिठ्ठीत होती.  या विमानाने मुंबईहून रविवारी पहाटे २.५५ वाजता उड्डाण केले होते. विमानात चिठ्ठी सापडताच वैमानिकाने ताबडतोब जवळच असलेल्या अहमदाबाद विमानतळाच्या वाहतूक नियंत्रकांशी संकर्प साधला. हे विमान (९ डब्ल्यू ३३९) सोमवारी पहाटे ३.४५ वाजता अहमदाबाद विमानतळावर उतरविण्यात आले होते. तेथे सर्व प्रवाशांना खाली उतरवून त्यांची कसून चौकशी करण्यात आली. याबाबत माहिती देताना सुरक्षा ब्यूरोच्या एका अधिका-याने सांगितले की, सर्व प्रवाशांची झडती घेतल्यानंतर काहीही सापडले नाही. या विमानतळावर ६ तासांपेक्षा अधिक वेळ तपासणी आणि अन्य कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर सकाळी १०.३० वाजता हे विमान दिल्लीसाठी रवाना झाले.उर्दू आणि इंग्रजी भाषेत लिहिलेल्या या चिठ्ठीत ‘अल्लाह इज ग्रेट’ असे लिहिले आहे. यात असा इशाराही दिला होता की, जर आपण विमानाच्या लँडिंगचा प्रयत्न कराल, तर तुम्हाला विमानात लोकांच्या मृत्यूचे चित्र दिसेल. याला थट्टा समजू नका. सामान ठेवण्याच्या जागी बॉम्ब आहेत. विमानाच्या लँडिंगचा प्रयत्न केला, तर स्फोट होईल.त्यानंतर विमान अपहरणाची धमकी देणाऱ्या बिरजू सल्ला याला अटक करण्यात आली होती. तो गुजरातच्या अमरेली जिल्ह्यातील राजुला येथील रहिवासी आहे. 

टॅग्स :Airportविमानतळ