शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

बदलत्या काळात राज्यपालांची भूमिका अधिक महत्त्वाची - राष्ट्रपती रामनाथ कोविंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2019 07:13 IST

देशात सहकारी आणि स्पर्धात्मक संघराज्यावर अधिक भर दिला जात असल्यामुळे राज्यपाल आणि नायब राज्यपाल यांची भूमिका महत्त्वाची बनली आहे, असे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शनिवारी केले.

नवी दिल्ली : देशात सहकारी आणि स्पर्धात्मक संघराज्यावर अधिक भर दिला जात असल्यामुळे राज्यपाल आणि नायब राज्यपाल यांची भूमिका महत्त्वाची बनली आहे, असे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शनिवारी केले.येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यपाल आणि नायब राज्यपालांच्या दोनदिवसीय परिषदेचे उद्घाटन राष्ट्रपती कोविंद यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. कोविंद यांनी सांगितले की, देशातील सर्वच राज्यपालांना सार्वजनिक जीवनाचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्याचा जास्तीत जास्त लाभ देशातील जनतेला व्हायला हवा. राष्ट्रपती भवनाच्या वतीने अधिकृतरीत्या जारी करण्यात आलेल्या निवेदनात राष्ट्रपती कोविंद यांच्या भाषणाची माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार कोविंद यांनी म्हटले की, आपण हल्ली सहकारी संघराज्य आणि निरोगी स्पर्धात्मक संघराज्य यावर भर देत आहोत. या पार्श्वभूमीवर राज्यपालांची  भूमिका अधिक महत्त्वाची ठरते. सहकारी संघराज्य म्हणजे केंद्र आणि राज्य सरकारांनी परस्परविरोधी धोरणांऐवजी स्थानिक स्वराज्य संस्थांना सोबत घेऊन एकसमान धोरणांवर काम करणे होय. स्पर्धात्मक संघराज्य म्हणजे राज्यांनी परस्परांशी, केंद्राशी स्पर्धा करणे होय.बांधिलकी...कोविंद यांनी सांगितले की, घटनेचे संरक्षण करणे एवढेच मर्यादित काम राज्यपालांचे नाही. आपल्या राज्यातील लोकांच्या सेवेत सातत्याने कार्यरत राहण्याशी त्यांची बांधिलकी आहे. अंतिमत: आपण सगळेच लोकांसाठी काम करतो. आपण लोकांना उत्तरदायीही आहोत.

टॅग्स :Ramnath Kovindरामनाथ कोविंदPresidentराष्ट्राध्यक्षIndiaभारत