शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सीपीईसीविषयी भारताशी चर्चा करण्याची तयारी, चीनची भूमिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 02:13 IST

पाकव्याप्त काश्मीरमधून जाणाºया, तसेच ५० अब्ज डॉलरचा खर्च अपेक्षित असलेल्या चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडोर (सीपीईसी)बाबत भारताशी असलेले मतभेद संपविण्यासाठी त्या देशाशी चर्चा करण्यास तयार असल्याचे चीनने म्हटले आहे. पाकव्याप्त काश्मीरवर भारत सतत हक्क सांगत असून, त्या वादग्रस्त भागातून हा प्रकल्प जात असल्याबद्दल भारताने चीनकडे नाराजी व्यक्त केली आहे.

बिजींग : पाकव्याप्त काश्मीरमधून जाणाºया, तसेच ५० अब्ज डॉलरचा खर्च अपेक्षित असलेल्या चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडोर (सीपीईसी)बाबत भारताशी असलेले मतभेद संपविण्यासाठी त्या देशाशी चर्चा करण्यास तयार असल्याचे चीनने म्हटले आहे. पाकव्याप्त काश्मीरवर भारत सतत हक्क सांगत असून, त्या वादग्रस्त भागातून हा प्रकल्प जात असल्याबद्दल भारताने चीनकडे नाराजी व्यक्त केली आहे.सीपीईसीसंदर्भात असलेल्या मतभेदांकडे कानाडोळा करण्यात येऊ नये, असे मत भारताचे चीनमधील राजदूत गौतम बंबवाले यांनी चीनच्या ग्लोबल टाइम्स या सरकारी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केले होते. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हुआ चुनयिंग यांनी सांगितले की, सीपीईसीसंदर्भातील मतभेदांबाबत चीन भारताशी चर्चा करण्यास तयार आहे. या मतभेदांचा दोन्ही देशांच्या संबंधांवर परिणाम होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ.सीपीईसी हा आर्थिक सहकार्याशी निगडित प्रकल्प आहे. चीन व पाकिस्तान दरम्यानचा हा प्रकल्प राबविताना तिसºया देशाला लक्ष्य करण्याचा आमचा उद्देश नाही. ही बाजू भारताने लक्षात घेतली पाहिजे. भारतासोबतचे संबंधआणखी दृढ व्हावे, म्हणून चीन प्रयत्नशील आहे. (वृत्तसंस्था)भारताला शह देण्याचा प्रयत्न?चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडोर (सीपीईसी) या प्रकल्पा दरम्यान अनेक पायाभूत सुविधांची बांधकामे केली जात आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातील गद्वार बंदराचा भाग हा रस्तेवाहतुकीच्या माध्यमातून थेट चीनच्या झिनजियांग प्रांताशी जोडला जाणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून चीन व पाकिस्तान भारताला शह देऊ पाहात आहे, असाही मतप्रवाह आहे.

टॅग्स :Indiaभारतchinaचीन