शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआचे उमेदवार अजित पवारांच्या पाया पडले, दादा अवघडले; पंगतीला बोलणेही टाळले
2
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
3
"तू बारामतीचा उमेदवार बदल, मी प्रचार करतो"; अजितदादांनी सांगितला श्रीनिवास पवारांचा किस्सा
4
“श्रीकृष्णासारखा नेता आमचे सारथ्य करणार आहे”; शिंदे गटातील नेत्याची PM मोदींवर स्तुतिसुमने
5
बस झालं, हार्दिक पांड्याला पूर्वीसारखं महत्त्व देण्याची गरज नाही; इरफान पठाण संतप्त 
6
"बँक से..," Kotak Mahindra बँकेचे शेअर्स आपटल्यावर अशनीर ग्रोव्हरनं उडवली खिल्ली
7
'डिप्रेशनमध्ये मी तेव्हा आयुष्य संपवून टाकणार होतो'; जो बायडेन यांचा धक्कादायक खुलासा
8
Vastu Shastra: देवघराजवळ 'या' गोष्टी ठेवणे त्रासदायक ठरू शकते; वाचा वास्तू नियम!
9
मोदींवर टीका करणाऱ्या संजय राऊत यांना हसन मुश्रिफ यांचं प्रत्युत्तर, म्हणाले, मग शाहू महाराजांना...
10
Akshaya Tritiya 2024: यंदा अक्षय्य तृतीया कधी? साडेतीन मुहूर्तांमध्ये या तिथीला स्थान का? वाचा!
11
अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केले ५३ पानी उत्तर, EDच्या आरोपांचा घेतला समाचार
12
' माझी कामं स्वतःच्या प्रचार पुस्तिकेत छापली'; सुप्रिया सुळेंची नक्कल करत अजित पवारांची टीका
13
सिट्रॉएन, महिंद्रानंतर होंडाची बारी; अमेझला 2019 मध्ये 4 स्टार, 2024 मध्ये दोन स्टार
14
T20 WC 2024: हर्षा भोगलेंनी निवडला भारतीय संघ; KL राहुलला वगळलं, नव्या चेहऱ्यांना संधी
15
"शिवरायांच्या गादीविरोधात प्रचार करण्यासाठी मोदी कोल्हापुरात’’, संजय राऊत यांची बोचरी टीका 
16
रत्नागिरी: प्रचार ऐन रंगात आला, अन् ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखाला तडीपारीची नोटीस
17
FD Vs NSC: नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट की ५ वर्षांची एफडी; ₹२ लाखांच्या गुंतवणूकीवर कुठे जास्त फायदा?
18
Vastu Shastra: पाण्याचा माठ, टाकी घराच्या 'या' दिशेला असेल तर; पाण्यासारखा वाया जाईल पैसा!
19
काँग्रेसचा प्रचार यापुढे करणार नाही, नसीम खान यांची घोषणा; मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का!
20
'विशाल पाटलांबाबतची खेळी जयंत पाटलांकडून'; भाजपच्या माजी आमदाराचा खळबजनक दावा

रोहितची आत्महत्या वेदनादायी

By admin | Published: January 23, 2016 4:14 AM

हैदराबाद विद्यापीठाचा विद्यार्थी रोहित वेमुला याच्या आत्महत्येच्या मुद्द्यावर केंद्र सरकारवर चहूबाजूंनी टीका होत असताना शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मौन सोडत रोहितच्या

लखनौ/वाराणसी : हैदराबाद विद्यापीठाचा विद्यार्थी रोहित वेमुला याच्या आत्महत्येच्या मुद्द्यावर केंद्र सरकारवर चहूबाजूंनी टीका होत असताना शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मौन सोडत रोहितच्या मृत्यूवर तीव्र शोक व्यक्त केला. मात्र त्यांनी त्या वादात पडणे टाळले. लखनौच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठातील दीक्षान्त समारंभात बोलत असतानाच पंतप्रधानांना विद्यार्थ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. ‘मोदी गो बॅक’ आणि ‘इन्कलाब जिंदाबाद’ची घोषणाबाजी करीत काही विद्यार्थ्यांनी मोदींच्या व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला. अर्थात लगेचच पोलिसांनी या विद्यार्थ्यांना बाहेर काढले. या गोंधळातही मोदी यांचे भाषण सुरू होते.माझ्या देशातील एक युवा पुत्र रोहित यास आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलावे लागले, हे वेदनादायी आहे. पुत्र गमावलेल्या एका माऊलीचे दु:ख मी जाणू शकतो. या घटनेमागचे कारण आणि त्यावरून सुरू असलेले राजकारण आपल्या जागी आहे, केवळ एका माऊलीने पोटचा गोळा गमावला, हेच वास्तव आहे. मी हे दु:ख समजू शकतो, असे मोदी म्हणाले. अर्थात या प्रकरणी दोन केंद्रीय मंत्र्यांविरुद्ध होत असलेल्या आरोपांवर बोलणे त्यांनी टाळले. युवा वर्गाच्या सक्षमीकरणासाठी सरकार प्रयत्नरत आहे, हे सांगतानाच ‘जॉब सीकर’ नाही तर ‘जॉब क्रिएटर’ बना, असे आवाहन त्यांनी समस्त तरुणाईला केले. तत्पूर्वी वाराणसी या आपल्या मतदारसंघात मोदींच्या हस्ते दिव्यांगांना मदत उपकरणांचे वितरण करण्यात आले. भाजपाप्रणित रालोआ सरकार गरीब, दलित व शोषितांच्या कल्याणासाठी कटिबद्ध आहे. माझ्यावर सर्रास शाब्दिक हल्ले केले जातात. मला वादात गोवण्याचे प्रयत्न होतात. कधीकधी संपूर्ण जग माझ्या विरोधात गेले आहे, असे मला वाटते. पण गरीब आणि उपेक्षित व गरजूंसाठी झटणे, त्यांची मदत करणे हा माझा मूलमंत्र आहे. त्यामुळे माझ्यावर तुटून पडणाऱ्यांची मी जराही पर्वा करीत नाही. व्यवस्था बदलते आहेत, त्यामुळे हे होत आहे. मध्यस्थ, दलालांना बाजूला सारले जात आहे. दुकानदाऱ्या बंद केल्या जात आहे. त्याचमुळे काही लोक अस्वस्थ आहेत. पण मी मात्र जराही अस्वस्थ नाही. मी अस्वस्थ आहे तर ते केवळ गरिबांची दुर्दशा आणि त्यांच्या समस्यांमुळे, असे मोदी यावेळी म्हणाले.‘सुगम्य भारत अभियान’सरकारी कार्यालयांमध्ये दिव्यांग लोकांना सुविधा प्रदान करण्यासोबतच त्यांचे आयुष्य अधिक सुविधाजनक बनविण्यास मदत करण्यासाठी मोदींनी ‘सुगम्य भारत अभियान’ चालविण्याची घोषणा केली. गरज भासल्यास यासाठी काही नियम व कायदे बदलण्याचे सूतोवाचही त्यांनी केले. सरकारी कार्यालयांत दिव्यांग लोकांसाठी विशेष मार्ग आणि शौचालयाच्या सीट असतील, असेही त्यांनी सांगितले.‘दिव्यांग’ घेऊन जाणाऱ्या बसला अपघातवाराणसी: पंतप्रधानांच्या मदत वितरण कार्यक्रमासाठी दिव्यांगांना घेऊन निघालेली एक बस शुक्रवारी सकाळी येथील एका खांबांवर आदळली. यामुळे या अपघातात २२ जण जखमी झाले. बसमध्ये सुमारे ४२ दिव्यांग व्यक्ती होत्या. मोदींनी आपल्या मतदारसंघात सुमारे ८ हजार दिव्यांगांना मदत साहित्याचे वाटप केले.