शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या सप्तपदीतील शेवटची फेरी आज; ८ राज्यांत ५७ जागांवर दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
2
LPG Price Cut: महिन्याच्या सुरुवातीलाच खूशखबर, स्वस्त झाला LPG Cylinder; पाहा नवे दर
3
Porsche Car Accident : अल्पवयीन कारचालकाची आई शिवानी अग्रवाल अटकेत; बाळाला वाचवण्यासाठी ब्लड सॅम्पल बदलल्याचा पोलिसांना संशय
4
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण: माजी संचालिकेचा सहभाग, पोलिसांचा सत्र न्यायालयात दावा
5
7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! DA नंतर आता ग्रॅच्युइटीत केली वाढ, पाहा डिटेल्स 
6
मंगळाचे स्वराशीत गोचर: ६ राशींना अच्छे दिन, जबरदस्त यश-लाभ; मेहनतीचे योग्य फल, मंगलमय काळ!
7
डाेंबिवली MIDC स्फोट प्रकरण: मलय, स्नेहाला न्यायालयीन कोठडी; अधिकाऱ्यांची होणार चौकशी
8
Panchayat 3 Web Series: प्रधानजींचं घर, पाण्याची टाकी, जाणून घ्या कुठे आहे 'पंचायत'मधलं खरं गाव?
9
४८ तास उलटूनही ‘तो’ पोकलेन चालक बेपत्ता; ब्लॉक कापण्यासाठी डायमंड कटर मागवले
10
थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल; केंद्राच्या हवाल्याने उपमुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती
11
आजचे राशीभविष्य - 1 जून 2024 : भिन्नलिंगी व्यक्तीचा तुमच्या जीवनावर पगडा असेल, मान-सन्मान मिळेल
12
‘मेगा’ हालसाठी तयार राहा! ‘मरे’वर आज ५३४ लोकल फेऱ्या रद्द! दोन परीक्षाही पुढे ढकलल्या
13
कोस्टल रोड सुरक्षित, बोगद्यात झिरपणारे पाणी रोखण्यात यश- मुंबई महानगरपालिका
14
खूशखबर! जीडीपी वाढला ८.२ टक्क्यांनी; भारताचा दर हा जगात सर्वाधिक वाढीचा!
15
बँकांतील सायबर गुन्ह्यांमध्ये ३०० टक्के वाढ; ३६ हजार ग्राहकांना ३०,००० कोटींचा आर्थिक फटका
16
विठ्ठल मंदिरी सापडले तळघर अन् ६ मूर्ती; साेळाव्या शतकातील मूर्ती असल्याचा अंदाज
17
सर्वसामान्यांची लाल परी झाली ७६ वर्षांची! वर्धापन दिनानिमित्त एसटी स्थानके रांगोळीने सजणार
18
२० मेडिकल कॉलेजांना आयोगाने ठोठावला दंड; त्रुटी दूर करण्यासाठी दिला २ महिन्यांचा अवधी
19
प्रसारमाध्यमांकडे तक्रार केल्याने विद्यार्थ्यांवर कारवाई; विद्यापीठाची प्रतिमा मलिन केल्याचा ठपका
20
मुंबई विद्यापीठाचा बीए सत्र सहाचा निकाल ४९ टक्के; यंदा ४८०६ विद्यार्थी झाले अनुत्तीर्ण

रोहित शेखर यांची हत्याच झाली; कुटुंबियांची चौकशी सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2019 3:44 AM

गुदमरून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अहवाल

नवी दिल्ली : उत्तर प्रदेश व उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आणि आंध्र प्रदेशचे माजी राज्यपाल एन. डी. तिवारी यांचे पुत्र रोहित शेखर (३९) यांची हत्याच झाली असल्याचे मृतदेहाच्या उत्तरीय तपासणीतून समोर आले आहे. रोहित यांचा मृत्यू गुदमरून झाल्याचे प्राथमिक अहवालात म्हटले आहे.मंगळवारी रोहित यांना दिल्लीच्या मॅक्स रुग्णालयात आणण्यात आले होते. त्यांचा आधीच मृत्यू झालेला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दिल्ली पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून, गुन्हे शाखेकडे तपास सोपविला आहे. एम्स रुग्णालयाचे प्राध्यापक आणि न्यायवैद्यक विज्ञान शाखेचे प्रमुख डॉ. सुधीर गुप्ता यांनी सांगितले की, पाच डॉक्टरांच्या पथकाने रोहित यांचे शवविच्छेदन केले. रोहित यांच्या मानेवर काही खुणा आढळल्या आहेत. एक किंवा त्यापेक्षा अधिक उशांनी तोंड दाबून त्यांना मारण्यात आले असावे.एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, रोहित यांच्या डिफेन्स कॉलनीतील घरात काही उशा सापडल्या असून, त्यातील एका उशीवर रक्ताचे डाग आढळून आले आहेत. पुढील आठवड्यात शवविच्छेदनाचा संपूर्ण अहवाल येईल, तेव्हाच चित्र अधिक स्पष्ट येईल. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रोहित यांच्या कुटुंबियांची चौकशी सुरू केली आहे. न्यायवैद्यक डॉक्टरांचे पथक आणि पोलीस यांनी घराची पाहणी केली. त्यांच्या कुटुंबियांच्या जबाबात तफावत आढळून आल्याचे पोलिसांनी सांगितले. डॉक्टरांच्या अंदाजानुसार दुपारी १ ते १.३0 च्या दरम्यान त्यांचा मृत्यू झालेला असावा. मृत्यूच्या वेळी त्यांचा भाऊ सिद्धार्थ, पत्नी अपूर्वा आणि काही नोकर घरी होते.त्यादिवशी नेमके काय झाले?रोहित हे मतदान करून सोमवारी सकाळी ११.३० वा. घरी परतले. मंगळवारी सायंकाळी ४.४१ वा. त्यांचा मृतदेह घरात सापडला. त्यांनी आत्महत्या केली असावी, असे सुरुवातीला वाटले होते. मॅक्स हॉस्पिटलला त्यांच्या घरून फोन आला तेव्हा त्यांच्या आई उज्ज्वला तिवारी स्वत:वर उपचार करून घेण्यासाठी रुग्णालयातच होत्या. उज्ज्वला यांना घरून फोन आला की, रोहित यांच्या नाकातून रक्त येत आहे. त्या अ‍ॅम्ब्युलन्स घेऊन घरी गेल्या. रोहित यांना ५ वा. रुग्णालयात आणले तेव्हा ते मृतावस्थेतच होते.

टॅग्स :Murderखून