शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
3
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
4
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
5
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
6
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
7
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
8
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
9
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
10
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
11
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
12
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
13
अमेठीत २५ वर्षांत प्रथमच मैदानात नसेल गांधी घराणे; बालेकिल्ल्यातून काॅंग्रेसने उमेदवार बदलला, भाजप नेत्यांचे टीकास्त्र
14
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
15
Akshaya Tritiya 2024: चैत्रगौरीला निरोप देताना कुंकवाची पावलं काढा आणि 'पुनरागमनायच' म्हणा; कारण...
16
खासदारांना डावलून आमदार रिंगणात, नव्या चेहऱ्यांमुळे चुरस; रणनीती ठरणार का यशस्वी?
17
'ही' साऊथ अभिनेत्री, जी प्रेमासाठी बनली वयानं २७ वर्ष मोठ्या असलेल्या माजी CM ची दुसरी पत्नी
18
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
19
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
20
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी

रोहिंग्यांना भारतात आश्रय नाही, ते घुसखोर, निर्वासित नाहीत- राजनाथ सिंह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 4:46 AM

बांगलादेशमार्गे म्यानमारमधून आलेले रोहिंग्या मुस्लीम हे निर्वासित नसून, बेकायदा स्थलांतरित असल्याने त्यांना भारतात आश्रय दिला जाणार नाही, असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी स्पष्ट केले.

नवी दिल्ली : बांगलादेशमार्गे म्यानमारमधून आलेले रोहिंग्या मुस्लीम हे निर्वासित नसून, बेकायदा स्थलांतरित असल्याने त्यांना भारतात आश्रय दिला जाणार नाही, असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी स्पष्ट केले.राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या परिसंवादात राजनाथ सिंह म्हणाले की, निर्वासिताचा दर्जा मिळविण्याची एक निश्चित प्रक्रिया असते व यांच्यापैकी कोणीही ती पूर्ण केलेली नाही. त्यांनी भारताकडे राजाश्रयही मागितलेला नाही. त्यामुळे ते बेकायदा स्थलांतरित आहेत. मानवी हक्कांच्या नावाखाली बेकायदा स्थलांतरितांना निर्वासित ठरविण्याची चूक करता कामा नये.म्यानमारच्या सीमेवरील रखाइन प्रांतात बंडखोरांनी सुरक्षा ठाण्यांवर हल्ले केल्यानंतर तेथील लष्कराने जोरदार कारवाई सुरू केली. तेव्हापासून त्या प्रांतातून सुमारे ४.२० लाख रोहिंग्यांनी बांगलादेशात स्थलांतर केल्याचे संयुक्त राष्ट्रसंघाचे म्हणणे आहे. त्यापैकी काही हजार रोहिंग्या भारतात आले आहेत.>टीका अनाठायीयोग्य शहानिशा करून रोहिंग्यांना परत येऊ देण्यास म्यानमारची तयारी आहे, असे सांगून, राजनाथ सिंह म्हणाले की, रोहिंग्यांना परत पाठविण्याच्या भारताच्या भूमिकेवर होणारी टीका अनाठायी आहे. रोहिंग्यांना परत पाठविल्याने कोणत्याही आंतरराष्ट्रीय कराराचे उल्लंघन होणार नाही. संयुक्त राष्ट्र संघाच्या १९५१च्या निर्वासितांसंबंधीच्या समझोत्यावर भारताने स्वाक्षरी केलेली नाही.

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंह