शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

रोबोटनं वाचवले रिक्षाचालकाचे प्राण

By admin | Updated: May 17, 2017 18:25 IST

आशिया खंडातली पहिली शस्त्रक्रिया. पर्किन्सन्सच्या आजारावर आणि परिस्थितीवर केली मात

 - मयूर पठाडे

 
पर्किन्सन या आजारानं काय होतं माहीत आहे? अंग थरथरतं, मेंदूवर परिणाम होतो, अंगातली शक्ती जाते. कोणतंच काम धडपणानं जमत नाही. स्मृतीही बर्‍यापैकी जाते आणि अनेकदा तर कोणाला ओळखणंही मुश्कील होतं. भारतातही अनेक मान्यवरांना या आजाराला सामोरं जावं लागलं आहे. केरळ राज्यातल्या थ्रिसूर इथला एक साधा रिक्षा ड्रायव्हर. त्यालाही याच आजारानं ग्रासलं होतं. त्याचं सगळं कुटुंबच त्यामुळे उद्ध्वस्त होण्याची वेळ आली होती, पण एका रोबोटनं त्याला वाचवलं आणि त्याचं आयुष्य पुन्हा मार्गावर आलं. या रोबोटला तो आता मनापासून धन्यवाद देतोय.
पर्किन्सनसारख्या आजारानं त्रस्त असलेल्या रुग्णाला रोबोटनं वाचवल्याची आणि त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्याची ही घटना संपूर्ण देशातच नव्हे, आशिया खंडातली पहिलीच घटना आहे. 
 
 
ही घटनाच मोठी खळबळजनक आणि रंजक.
केरळ राज्यातल्या थ्रिसूरमध्ये ऑटोरिक्षा चालवून कसंबसं आपल्या कुटुंबाचं पोट भरणारा झुबीर हा रिक्षाचालक. काही महिन्यांपूर्वी पर्किन्सन या आजारानं त्याला घेरलं आणि त्याचं सारं कुटुंबच अडचणीत आलं. या आजारामुळे त्याला साधी रिक्षाही चालवता येईना. तरीही तो चालवायचा. कारण पोट भरायचं होतं. कुटुंबाला पोसायचं होतं. काम न करून कसं चालेल?
अशाही अवस्थेत तो रिक्षा चालवायचा. प्रवाशांना आपल्या रिक्षात बसवायचा. पण रिक्षा सुरू करून थोडं पुढे जात नाही तोच, त्याचे हात थरथरायला लागायचे. रिक्षा डगमगायला लागायची. वेडीवाकडी जायची. प्रवाशांसह आता कोणाला ठोकरतो की काय, अशी परिस्थिती निर्माण व्हायची. प्रवाशांचा जीवही धोक्यात यायचा. 
आपली रिक्षा थांबवण्याशिवाय त्याला पर्यायच नसायचा. प्रवाशांना तो नम्रपणे विनंत करायचा. आता मी रिक्षा आणखी पुढे नेऊ शकत नाही. कृपया तुम्ही दुसर्‍या कुठल्या वाहनानं आपल्या इच्छित स्थळी जा.
कोची इथल्या अमृता इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एआयएमएस) या हॉस्पिटलमध्ये नुकतीच त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.
 
 
या शस्त्रक्रियेचं वैशिष्ट्य म्हणजे या शस्त्रक्रियेसाठी एका रोबोटची मदत घेण्यात आली. या शस्त्रक्रियेसाठी इतकी अचूकता लागते की मानवी हातांनी इतकी अचूकता येणं शक्यच नाही. रोबोटनं ही शस्त्रक्रिया अत्यंत यशस्वीपणे पार पाडली. आशिया खंडातली अशा प्रकारची ही पहिलीच शस्त्रक्रिया आहे. डीप ब्रेन स्टिम्युलेशनची (डीबीएस) ही शस्त्रक्रिया अत्यंत किचकट मानली जाते. 
या शस्त्रक्रियेमुळे 45 वर्षीय रिक्षाचालक झुबीरला नव्यानं आयुष्य मिळालं आहे. आता तो पूर्वीप्रमाणेच आपली रिक्षा चालवू शकेल आणि त्याच्या रिक्षा चालवण्यामुळे कोणाचाही जीव धोक्यात येणार नाही.
झुबीरची परिस्थिती पाहता या शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयानं त्याच्याकडून पाच पैशाचीही फी घेतली नाही.
वैद्यकीय क्षेत्रात आता मोठय़ा प्रमाणात रोबोट येताहेत आणि रुग्णांना त्यामुळे जीवदान मिळू लागलं आहे.