शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
5
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
6
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
7
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
8
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
9
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
10
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
12
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
13
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
14
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
15
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
16
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
17
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
19
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया

रॉबर्ट वाड्रा यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2019 04:29 IST

परदेशात अवैध संपत्ती खरेदी केल्याप्रकरणी रॉबर्ट वाड्रा यांनी गुरुवारी चौकशीसाठी हजर राहावे, असे समन्स अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) नव्याने बजावले.

नवी दिल्ली : परदेशात अवैध संपत्ती खरेदी केल्याप्रकरणी रॉबर्ट वाड्रा यांनी गुरुवारी चौकशीसाठी हजर राहावे, असे समन्स अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) नव्याने बजावले. वाड्रा कॉँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांचे पती आहेत.वाड्रा यांनी ईडीच्या तपास अधिकाऱ्यांपुढे सकाळी साडेदहा वाजता हजर राहावे लागणार आहे. त्यांनी या प्रकरणात अटकपूर्व जामीन घेतला आहे. गेल्या आठवड्यात ईडीने दिल्ली उच्च न्यायालयास हा जामीन रद्द करावा, असा अर्ज केला होता. त्यावर न्यायालयाने वाड्रा यांना त्यांची बाजू मांडण्याचे आदेश दिले होते. ईडीने आपणास याच खटल्यात अनेकदा गुंतविल्याचा वाड्रा यांचा दावा आहे, तर तपासात सहकार्य करत नसल्याने त्यांना ताब्यात घेणे आवश्यक आहे, असे ईडीचे म्हणणे आहे. ज्या न्यायालयाने वाड्रा यांना अटकपूर्व जामीन देऊन दिलासा दिला, त्या न्यायालयाने या प्रकरणाच्या गांभीर्याबद्दल चर्चा केलेली नाही, असा दावा ईडीने न्यायालयात केला. लंडनमध्ये कोट्यवधी रुपयांची (१.९ अब्ज ब्रिटीश पौंड) जागा खरेदी करण्यासाठी वाड्रा यांनी अवैध सावकारी मार्गाने जमा केलेल्या पैशांचा वापर केला, असा ईडीचा संशय आहे. वाड्रा यांनी लंडनमध्ये खरेदी केलेल्या अनेक नव्या मालमत्तांची माहिती आपल्याला असल्याचे ईडीतर्फे न्यायालयास सांगण्यात आले.>लंडनला जाण्याच्या तयारीतरॉबर्ट वाड्रा यांनी दिल्ली येथील न्यायालयात वैद्यकीय प्रमाणपत्र सादर केले आहे. आतड्यातील ट्यूमरच्या उपचारासाठी लंडनला जाण्याची परवानगी त्यांनी मागितली आहे. यापूर्वी त्यांनी ईडीकडेसुद्धा परदेशात जाण्यास परवानगी देण्यासाठी अर्ज केला होता. न्यायालयाने ३ जूनपर्यंत आपला निर्णय राखून ठेवला आहे. ही सुनावणी ‘सीबीआय’च्या विशेष न्यायालयापुढे झाली.

टॅग्स :robert vadraरॉबर्ट वाड्रा