शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

अमेरिकेतील रस्त्यांपेक्षा मध्य प्रदेशातील रस्ते अधिक चांगले, शिवराज सिंह चौहान यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2017 10:13 AM

अमेरिकेतील रस्त्यांपेक्षा मध्य प्रदेशातील रस्ते अधिक चांगले आहेत, असा दावा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केला आहे.

नवी दिल्ली - अमेरिकेतील रस्त्यांपेक्षा मध्य प्रदेशातील रस्ते अधिक चांगले आहेत, असा अजब-गजब दावा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केला आहे. मंगळवारी (24 ऑक्टोबर)त्यांनी हे विधान केले आहे. शिवराज सिंह चौहान यांनी वॉशिंग्टन डीसीतील रस्त्यांच्या दुरावस्थेवर निराशा व्यक्त करत सांगितले की, जेव्हा मी वॉशिंग्टन डीसी विमानतळावर उतरलो आणि तेथून रस्त्यानं प्रवास केला. त्यावेळी मध्य प्रदेशातील रस्ते अमेरिकेतील रस्त्यांपेक्षा चांगले असल्याचं जाणवलं.  

शिवराज सिंह चौहान पाच दिवसांच्या अमेरिकेच्या दौ-यावर आहेत. अमेरिकेच्या यूएसआयएसपी फोरमसोबत होणा-या बैठकीत शिवराज सिंह चौहान आपल्या प्रांतात गुंतवणूक करण्याच्या फायद्याची माहिती अमेरिकेला देणार आहेत. 

दरम्यान, यावेळी शिवराज सिंह चौहान यांनी केंद्र सरकारकडून लागू करण्यात आलेल्या जीएसटीच्या निर्णयाचीही स्तुती केली. ''पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत देश महान आर्थिक विकासाच्या मार्गावर आहे. जीएसटी ही बदल घडवून आणणारी कर प्रणाली आहे''. गुंतवणूकदारांसाठी 'एक देश, एक कर आणि एक बाजार' चं स्वप्न पूर्ण होण्यासारखं असल्याचेही चौहान म्हणाले. 

अमेरिकेत बोलताना शिवराज सिंह चौहान म्हणाले की, जीएसटीमुळे भारतात व्यवसाय सुलभ झाला आहे. यावेळी त्यांनी मध्य प्रदेशातील रस्त्यांचीही स्तुती केली. मध्य प्रदेश सरकारनं जवळपास 1.75 लाख किलोमीटर पर्यंत रस्त्यांची बांधणी केली आहे आणि राज्यातील सर्व गावांना रस्त्यांनी जोडले आहे. 

यूएस इंडिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरम (यूएसआईएसपीएफ) आणि सीआयआयतर्फे आयोजित कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर शिवराज सिंह चौहान यांनी वॉशिंग्टन डीसी येथील अमेरिकी इतिहास संग्रहालयलाही भेट दिली.  दरम्यान, शनिवारी शिवराज सिंह चौहान भारतात दाखल होतील.  

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेश