शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

आग्रा-लखनऊ महामार्गावर रस्ता खचला, 50 फूट खोल खड्ड्यात कोसळली एसयूव्ही कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2018 16:41 IST

उत्तर प्रदेशमधल्या आग्रा-लखनऊ या महामार्गावरचा रस्ता आज सकाळी अचानक खचला.

आग्रा- उत्तर प्रदेशमधल्या आग्रा-लखनऊ या महामार्गावरचा रस्ता आज सकाळी अचानक खचला. त्याच दरम्यान भरधाव वेगानं येणारी एक एसयूव्ही कार रस्ता खचून तयार झालेल्या खड्ड्यात पडली. हा खड्डा 50 फूट खोल असल्यानं कार त्यात जाऊन अडकली. कार सरळ खड्ड्यात जाऊन अडकली असून, कारमधील लोकांना सुरक्षितरीत्या बाहेर काढण्यात आलं.ही घटना बुधवारी सकाळी डोकी परिसरातल्या वाजिदपूर पुलिया येथे घडली आहे. यावेळी कारमध्ये चार जण बसले होते. मुंबईहून ते कन्नोजला येत होते. अपघातातून थोडक्यात बचावलेले लोक कन्नोजचे रहिवासी आहेत. ते मुंबईतून कार खरेदी करून परतत होते.  त्यांच्याबरोबर कुटुंबातील तीन सदस्यही होते. त्यांना रस्ता माहीत नसल्यानं ते जीपीएसच्या मदतीनं महामार्गावर गाडी चालवत होते. त्याच वेळी अचानक नेटवर्क गेलं आणि जीपीएस बंद झालं. जीपीएस बंद झाल्यानं ते सर्व्हिस रोडवर आले, दरम्यान त्यांच्या गाडीचा वेग भरधाव होता. त्यामुळेच सर्व्हिस रोडवर त्यांना कोणताही खड्डा दिसला नाही.ब्रेक लावण्याच्या आधीच त्यांची गाडी 50 फूट खोल खड्ड्यात कोसळली आणि अडकली.  पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून बचावकार्य राबवत कारमधील माणसांना सुखरूप बाहेर काढलं. समाजवादी पक्षानं हा आग्रा-लखनऊ महामार्ग बनवला आहे. अवघ्या 22 महिन्यांत हा महामार्ग तयार करण्यात आला असून, त्याला 13,200 कोटी रुपये खर्च आला आहे. हा महामार्ग 302 किलोमीटर लांब आहे. माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी या महामार्गाचं उद्घाटन केलं होतं. 

टॅग्स :carकार