शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

इथे ओशाळली माणुसकी! २० मिनिटं 'तो' रक्ताच्या थारोळ्यात पडलेला; लोक काढत होते Video

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2024 13:37 IST

माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना घडली आहे. एक तरुण रस्त्याच्या कडेला रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. रस्त्यावरून जाणारी प्रत्येक व्यक्ती जखमी तरुणाला पाहत होती.

गाझियाबादमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना घडली आहे. आयपीईएम कॉलेजजवळ एक तरुण रस्त्याच्या कडेला रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. रस्त्यावरून जाणारी प्रत्येक व्यक्ती जखमी तरुणाला पाहत होती. त्याचे फोटो आणि व्हिडीओ काढण्यासाठी थांबली होती. पण गर्दीत असलेलं कोणीच त्या जखमी व्यक्तीला मदत करण्यासाठी पुढे आलं नाही. तरुण जीवन-मृत्यूशी झुंज देत होता आणि लोक त्याचा व्हिडीओ काढण्यात व्यस्त होते. 

प्रभात कुमार असं गाझियाबाद घटनेत जखमी झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. लोक जमलेले पाहून कॉन्स्टेबल सोनू सिंह तिथे पोहोचले. सोनू यांनी वेळ न वाया घालवता जखमी प्रभातला उचलून जवळच्या रुग्णालयात नेलं, जिथे प्रभातवर आता उपचार सुरू आहेत. कॉन्स्टेबलने दिलेल्या माहितीनुसार, घटना घडली तेथून काही मीटर अंतरावर ते ड्युटी करत होते. लोकांची गर्दी पाहून ते पुढे आले. सर्व लोक पाहत होते पण कोणीच मदतीसाठी पुढे आलं नाही. 

जखमी प्रभातवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचं म्हणणं आहे की, त्याला रुग्णालयात आणण्यास आणखी काही क्षणांचा विलंब झाला असता तर त्याला वाचवणं फार कठीण झालं असतं. या अपघातात प्रभातच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचं डॉक्टरांनी सांगितले. रस्त्याच्या कडेला तो जखमी अवस्थेत पडल्याने खूप रक्तस्त्राव झाला होता. कॉन्स्टेबल सोनू यांनी त्याचा जीव वाचवला आहे. 

रस्त्याच्या मधोमध कोणाचा जीव गेला तरी लोकांना काही फरक पडत नाही. प्रभातला वेळीच रुग्णालयात नेण्यासाठी सोनू यांनी वाहनचालकांना थांबण्याचा इशारा केला. मात्र कोणीही थांबायला तयार झालं नाही. अखेर एका ऑटो चालकाच्या मदतीने प्रभातला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं. तिथे त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.  

टॅग्स :Accidentअपघात