शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

मोदींनी शुभारंभ केलेली रो-रो सेवा 'टेक्निकल' कारणांमध्ये अडकली, अजूनही सुरूवात नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2017 18:05 IST

गुजरात निवडणूक जवळ येताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यात कार्यक्रमांचा धडाका लावला. गुजरात सरकारने 20 ऑक्टोबरला वृत्तपत्रात, रो-रो सेवा मंगळवारी (24 ऑक्टोबर) सामान्य जनतेसाठी सुरू होईल अशी जाहिरात दिली होती.

गांधीनगर - गुजरात निवडणूक जवळ येताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यात कार्यक्रमांचा धडाका लावला. गुजरात सरकारने 20 ऑक्टोबरला वृत्तपत्रात, रो-रो सेवा मंगळवारी (24 ऑक्टोबर) सामान्य जनतेसाठी सुरू होईल अशी जाहिरात दिली होती.  रविवारी पंतप्रधान मोदींनी सौराष्ट्राला दक्षिण गुजरातशी जलमार्गाने जोडणा-या ‘रोल ऑन-रोल ऑफ’ या  घोघा ते दाहेजदरम्यानच्या 650 कोटी आपल्या स्वप्नातील नौका सेवेच्या पहिल्या टप्प्याचा शुभारंभ केला. त्यावेळी मंगळवारपासून ही सेवा सुरू होईल अशी घोषणा सरकारकडून करण्यात आली होती.  मात्र, काही तांत्रिक परवानग्या न मिळाल्याने ही सेवा अजून सुरू झालेली नाही. आवश्यक परवानग्या मिळाल्यानंतर 26 ऑक्टोबरनंतर ही सेवा सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दुसरीकडे गुजरात मॅरीटाइम बोर्डाने ही सेवा 1 नोव्हेंबरच्या आधी सुरू होण्याची शक्यता कमी असल्याचं म्हटलं आहे. 

‘रो-रो’ नौका सेवा 24 ऑक्टोबरला सामान्य जनतेसाठी सुरू झाली नसली तरी  या फेरीने घोघा ते दाहेजदरम्यान प्रवास केला. प्रवाशांनीही यामधून प्रवास केला मात्र केवळ प्रवाशांच्या मनोरंजनासाठी ही फेरी चालवण्यात आली होती.  काय आहे रो-रो सर्व्हिस...घोघा ते दाहेजदरम्यानच्या 650 कोटी रुपये खर्चाच्या ‘रो-रो’ नौका सेवेमुळे प्रवासासोबत वाहन आणि मालाची वाहतूकही करता येणार आहे.वेळ वाचणार-सौराष्ट्र आणि दक्षिण गुजरातदरम्यान रस्त्याने प्रवास करण्यासाठी दहा तास लागतात. दाहेज ते घोघादरम्यानचे अंतर रस्तेमार्गे 310 किलोमीटर आहे. या जलमार्गाने हे अंतर 31 किलोमीटरवर येईल आणि वेळही कमी लागेल.>150 मोठ्या वाहनांची वाहतूक करता येणार>1000 लोक एकाच वेळी बोटीतून प्रवास करू शकतील>600 रुपये सध्या या नौका सेवेचे भाडे आहे.

टॅग्स :Gujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017BJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी