शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Ram Mandir: "रामलला आले नाहीत, निवडणुका आल्या आहेत", मंत्री तेजप्रताप यांचा खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2024 12:43 IST

विविध क्षेत्रातील दिग्गजांच्या उपस्थित सोमवारी रामलाचा अभिषेक सोहळा पार पडला.

नवी दिल्ली: तब्बल ५०० वर्षांची प्रतीक्षा संपली असून अयोध्येतील भव्य मंदिरात प्रभू श्री राम विराजमान झाले आहेत. विविध क्षेत्रातील दिग्गजांच्या उपस्थित सोमवारी रामललाचा अभिषेक सोहळा पार पडला. बॉलिवूडमधील कलाकार, उद्योजक, महंत, खेळाडू आणि राजकीय मंडळी यांची या कार्यक्रमासाठी लक्षणीय उपस्थिती होती. विरोधी पक्षांमधील नेत्यांना देखील निमंत्रण देण्यात आले होते. मात्र अनेकांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. यावरून राजकारण देखील तापले असून बिहारचे मंत्री तेजप्रताप यादव यांनी भाजपाला पुन्हा एकदा लक्ष्य केले आहे.

बिहार सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे सुप्रीमो लालू प्रसाद यादव यांचे ज्येष्ठ चिरंजीव तेजप्रताप यादव हे त्यांच्या वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असतात. राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्याबद्दल त्यांनी अलीकडेच एक विधान केले होते की, प्रभू श्री राम त्यांच्या स्वप्नात आले होते आणि त्यांनी अयोध्येत येणार नसल्याचे सांगितले होते. 

भाजपाला खोचक टोलादरम्यान, आता पुन्हा एकदा तेजप्रताप यांनी एक पोस्ट करून भाजपाला खोचक टोला लगावला आहे. त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हटले, "रामलला आले नाहीत, निवडणुका आल्या आहेत. आमच्या मनात, हृदयात आणि प्रत्येक कणात श्री राम आधीच विराजमान आहेत. सनातन धर्माच्या मान्यतेनुसार, प्रभू श्री राम हे भगवान विष्णूचा अवतार आहेत आणि भगवान विष्णूचा शेवटचा अलतार 'कल्की अवतार' याला कलियुगाच्या समाप्तीनंतर धर्माच्या पुनर्स्थापनेसाठी परत येणे बाकी आहे. सियावर रामचंद्र की जय." 

भाजपावर हल्लाबोलखरं तर या पोस्टद्वारे तेजप्रताप यादव यांनी आगामी काळात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीकडे लक्ष वेधले आहे. नाव न घेता त्यांनी एकप्रकारे भाजपावर हल्लाबोल केला आहे. राम मंदिरावरून विरोधी पक्षातील नेते थेट भाजपाला लक्ष्य करत आहेत. राम मंदिर हा भाजपाने निवडणुकीसाठी बनवलेला मुद्दा असल्याची टीका विरोधकांनी केली आहे. त्यावरून राजकारण सुरू आहे.

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरBiharबिहारLalu Prasad Yadavलालूप्रसाद यादवBJPभाजपाlok sabhaलोकसभा