शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

सरकार स्थापनेसाठी राजद प्रयत्नशील; रालोआतील घटक पक्षांना चुचकारणे सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2020 06:55 IST

विकासशील इन्सान पक्ष आणि हिंदुस्तानी अवाम मोर्चाला घातली गळ

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या राष्ट्रीय जनता दलाने सरकार स्थापनेसाठी हालचाली सुरू केल्या आहेत. राष्ट्रीय जनता दलप्रणीत महाआघाडीला ११० जागांवर विजय मिळवता आला आहे. बहुमताचा आकडा गाठण्यासाठी महाआघाडीला १२ आमदारांची गरज आहे. त्यासाठी राष्ट्रीय जनता दलाने विकासशील इन्सान पक्ष आणि हिंदुस्तानी अवाम मोर्चा या रालोआतील घटक पक्षांना चुचकारायला सुरुवात केली आहे.

अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या बिहार विधानसभा निवडणूक निकालात अखेरीस भाजपप्रणीत रालोआला १२५ जागांवर विजय मिळाला. २४३ सदस्यांच्या बिहार विधानसभेसाठी हे काठावरचे बहुमत आहे. त्यातही रालोआतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या जदयुला ४३ जागांवरच समाधान मानावे लागले, तर भाजपला घसघशीत ७४ जागांवर विजय मिळवता आला. भाजप-जदयुबरोबरच मुकेश साहनी यांचा विकासशील इन्सान पक्ष आणि जितनराम मांझी यांचा हिंदुस्तानी अवाम मोर्चा हे दोन पक्ष निवडणुकीच्या तोंडावर रालोआत सहभागी झाले.

लोक जनशक्ती पक्षाच्या फटक्यामुळे शक्तिपात झालेेल्या जदयुला सरकार स्थापनेची अजिबात उत्सुकता नाही; परंतु भाजपने नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालीच सरकार स्थापन होईल, असे स्पष्ट केले आहे. विकासशील इन्सान पक्ष आणि हिंदुस्तानी अवाम मोर्चा यांचे प्रत्येकी चार आणि एएमआयएमचे पाच आमदारांना सोबत घेतल्यास बहुमतासाठी आवश्यक असेलला १२२ चा आकडा राजदला ओलांडता येणार आहे. 

बिहार विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या राष्ट्रीय जनता दलाने सरकार स्थापनेसाठी हालचाली सुरू केल्या आहेत. राष्ट्रीय जनता दलप्रणीत महाआघाडीला ११० जागांवर विजय मिळवता आला आहे. बहुमताचा आकडा गाठण्यासाठी महाआघाडीला १२ आमदारांची गरज आहे. त्यासाठी राष्ट्रीय जनता दलाने विकासशील इन्सान पक्ष आणि हिंदुस्तानी अवाम मोर्चा या रालोआतील घटक पक्षांना चुचकारायला सुरुवात केली आहे.

तेजस्वी यादव यांचा आरोप

निवडणुकीदरम्यान रालोआने पैसा, मनगटशाही आणि दगाबाजी यांचा मुक्तहस्ते वापर केल्याने त्यांना अधिक जागा मिळाल्याचा आरोप तेजस्वी यादव यांनी केला. गुरुवारी तेजस्वी यादव यांची विधिमंडळ पक्षेनेतेपदी निवड झाली, त्यावेळी ते बोलत होते.  या निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकावर फेकल्या गेलेल्या जदयुचे नेते नितीशकुमार स्वत:च्या स्वाभिमानाला मुरड घालून मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीला चिकटून राहतील, असा चिमटा काढतानाच नितीश यांनी आता तरी खुर्चीचा मोह सोडावा, असे आवाहन तेजस्वी यांनी केले. 

जनतेने बदलाचा कौल दिला असून, नितीशकुमार यांच्याविरोधात मते दिली असल्याचे ते म्हणाले. अनेक ठिकाणी मतमोजणीत फेरफार झाला असून, किमान २० ठिकाणी तर विजयी आणि पराभूत उमेदवारांच्या मतांत अगदी नगण्य फरक असल्याचे सांगत या ठिकाणांवर फेरमतमोजणी केली जावी, अशी मागणी तेजस्वी यांनी केली. रालोआला महाआघाडीपेक्षा केवळ १२ हजार २७० मतेच अधिक असल्याचा दावाही त्यांनी केला. 

काँग्रेसमध्ये नाराजीचे सूरविधानसभा निवडणुकीत सपाटून मार खाणाऱ्या काँग्रेसमध्ये पुन्हा राहुल गांधी यांच्या नेतृत्वाविरोधात नाराजीचे सूर उमटू लागले आहेत. पक्षातील वरिष्ठांना बाजूला ठेवत तसेच बिहारमधील नेत्यांना अडगळीत टाकत दिल्लीतून आयात केलेल्या नेत्यांकडे प्रचाराची धुरा सोपविण्यात आली. त्यामुळे पक्षाला राज्यात चमकदार कामगिरी करता आली नाही, अशी चर्चा पक्षात सुरू आहे. ७० जागा लढविण्याचा आग्रह धरणाऱ्या काँग्रेसला फक्त १९ जागांवरच विजय नोंदवता आला. पक्ष नेतृत्वाने जुन्याजाणत्या नेत्यांवर विश्वास न दर्शवता नवोदितांकडे सू्त्रे दिल्यामुळे बिहारमध्ये दारुण पराभव झाल्याची चर्चा पक्षात आहे. 

सर्व काही भाजपसाठीच : चिराग पासवाननिवडणुकीच्या तोंडावर रालोआतून बाहेर पडून सवतासुभा  मांडणाऱ्या लोक जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी राज्यात भाजप प्रबळ व्हावा यासाठीच आम्ही या निवडणुकीत स्वतंत्र लढलो, अशी कबुली दिली आहे. विधानसभा निवडणुकीत सर्व जागांवर उमेदवार उभ्या करणाऱ्या लोक जनशक्ती पक्षाला केवळ एका जागेवर विजय मिळवता आला. मात्र, जदयुची मते खाण्याची महत्त्वाची भूमिका लोक जनशक्ती पक्षाने निभावली. आम्हाला आमचा पक्ष वाढविण्याचा हक्क असून, त्यासाठीच आम्ही स्वतंत्र निवडणूक लढवली. आमचा मतहिस्सा वाढला असल्याचेही चिराग पासवान म्हणाले. 

नितीशकुमार नाराज?पक्षाच्या खराब कामगिरीमुळे तिसऱ्या क्रमांकावर फेकल्या गेलेल्या जदयुचे नेते व मुख्यमंत्री नितीशकुमार नाराज असल्याचे समजते. अनेक जागांवर लोक जनशक्ती पक्षाने जदयुची मते खाल्ल्याने नितीशकुमार चिराग पासवान यांच्यावर खार खात असल्याचेही बोलले जात आहे. नाराज नितीशकुमार यांना भेटण्यासाठी गेलेल्या भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी नितीशकुमारच मुख्यमंत्री असतील, असे ठासून सांगितले आहे.  दरम्यान, पक्षाच्या वाताहतीमुळे नितीशकुमार मुख्यमंत्रीपदासाठी फारसे उत्सुक नसल्याचे समजते. 

दिग्विजयसिंह यांचे आवाहनकाँग्रेसचे नेते आणि मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजयसिंह यांनी नितीशकुमारांना तेजस्वी यादव यांना आशीर्वाद द्यावा, असे आवाहन केले आहे. नितीश यांनी भाजपच्या अमरवेलीला अधिक खतपाणी न घालता थेट महाआघाडीत सामील होऊन तेजस्वी यादव यांना आशीर्वाद द्यावा, अशा आशयाचे ट्वीट दिग्विजय यांनी केले आहे. मात्र, त्यावर जदयुची प्रतिक्रिया समजू शकलेली नाही.

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकNitish Kumarनितीश कुमार