श्रीनगर - काश्मीरमध्ये अपहरण करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांपैकी तिघांची दहशतवाद्यांनी हत्या केल्याने सुरक्षा दलांमध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान, या पोलीस कर्मचाऱ्यांच्या हत्येमागे हिज्बुल मुजाहिद्दीनचा कुख्यात कमांडर रियाज नायकू याचा हात असल्याचे समोर येत आहे. रियाज नायकू याने १२ मिनिटांचा एक व्हिडिओ शेअर करून पोलीस कर्मचाऱ्यांच्या अपहरणाची जबाबदारी स्वीकारली होती. तसेच त्याने व्हिडिओमधून दहशतवाद्यांच्या नातेवाईकांची तीन दिवसांत मुक्तता करण्यात यावी, अशी मागणी केली होती.
पोलिसांच्या हत्येमागे रियाज नायकूचा हात?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2018 15:09 IST