शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
2
VIDEO: पंतप्रधान मोदी नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनावेळी मराठीत काय बोलले? ऐका...
3
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
4
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
5
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
6
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
7
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
8
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
9
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
10
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
11
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
12
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
13
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
14
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
15
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
16
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
17
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
18
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
19
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
20
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?

जिल्ह्यात नदी-नाल्यांना पूर

By admin | Updated: July 30, 2014 00:21 IST

संततधार : इगतपुरी तालुक्यात विक्रम; पालखेडचा साठा वाढला

जिल्ह्यात नदी-नाल्यांना पूरसंततधार : इगतपुरी तालुक्यात विक्रम; पालखेडचा साठा वाढलानाशिक : गेल्या ४८ तासांत जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये सुरू असलेल्या संततधार पावसामुळे छोट्या मोठ्या नदी, नाल्यांना पूर आला आहे. इगतपुरी तालुक्यात विक्रमी पाऊस झाला असून, अनेक गावांचा घोटीशी संपर्क तुटला आहे. भावली धरण परिसरात सर्वाधिक पाऊस झाला आहे. दिंडोरी तालुक्यात धामण, कोळवण या नद्यांना पूर आला आहे. सिन्नर तालुक्यात म्हाळुंगी नदी दुथडी भरून वाहत आहे. घोटी/इगतपुरी : इगतपुरी तालुक्याच्या घाटमाथ्यासह पश्चिम भागात गेल्या ४८ तासांपासून पावसाची हजेरी कायम आहे. तालुक्याच्या भावली धरण परिसरात सर्वाधिक पावसाची नोंद झाली असून, सर्वात कमी पावसाची नोंद पूर्वभागात झाली आहे. पावसामुळे दारणा नदीला पूर आला असून, पुरामुळे नदीलगतची भात शेती पाण्याखाली गेली आहे. घोटीजवळील काळुस्ते रस्त्यावरील दारणा नदीवरील पूल पाण्याखाली गेला असल्याने चौदा गावांचा घोटी शहराशी संपर्क तुटला आहे.घाटमाथा व पश्चिम पट्ट्यात पाऊस कोसळत असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. दारणा नदीचे उगमस्थान असलेल्या भावली धरण परिसरात चोवीस तासांत ४१५ मि.मी. पावसाची विक्रमी नोंद झाली. दारणा नदीला पूर आला आहे. पुरामुळे चौदा गावांच्या रहदारीचा काळुस्ते पूल पाण्यात गेल्याने काळुस्ते, कांचनगाव, औचितवाडी, शेणवड बु., खडकवाडी, तळोघ, जुन्हावने, भरवज, निरपण, कुरुंगवाडी, मांजरगाव, बोरवाडी, दरेवाडी, सारुक्तेवाडी आदि गावांचा घोटीशी संपर्क तुटला आहे. घोटी वैतरणा रस्त्यावर नवीन वाकी खापरी धरणात या वर्षापासून पाण्याचा साठा केल्याने धरणाचे पाणी कोरपगाव व भावली गावाजवळील रस्त्यावर आले असून, हा रस्ता पाण्याखाली गेल्याने पन्नासहून अधिक गावांचा घोटी शहराशी संपर्क तुटला आहे. तालुक्यातील पूर्वभागातील सर्वतीर्थ टाकेद ते आधारवड रस्त्यावरील पूल पाण्याखाली गेल्याने या भागातील जनतेचा संपर्क तुटला.प्रशासन सज्जनिर्माण झालेली आपत्कालीन स्थिती लक्षात घेता यावर मात करण्यासाठी प्रशासन सज्ज असून, तहसीलदार महेंद्र पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांनी पट्टीचे पोहणारे, जीवरक्षक जवान तैनात केले आहेत.सिन्नर : तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात सलग दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे म्हाळुंगी नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. त्यामुळे परिसरातील बंधारे भरले आहे. एकीकडे म्हाळुंगी नदी दुथडी भरून वाहत असली तरी उंबरदरी धरण क्षेत्रात पाहिजे त्या प्रमाणात पाऊस नसल्याने धरणातील पाणीसाठ्यात म्हणावी तितकी वाढ झालेली नाही. ठाणगाव पट्ट्यात पावसाचे प्रमाण खूपच कमी झाले आहे. यावर्षीही पावसाळा सुरू होऊन दीड महिन्यांचा कालावधी उलटून गेल्यानंतरही या भागात पावसाने हजेरी लावली नव्हती. अधूनमधून मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी येत दिंडोरी येथील धामण नदीला आलेला पूर.होत्या; मात्र त्यामुळे म्हाळुंगी नदीला पाणी आले नव्हते. अकोले तालुक्यातील विश्रामगड परिसरात गेल्या तीन-चार दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू असल्याने म्हाळुंगी नदीला पाणी वाहू लागले आहे. ठाणगाव परिसरातही गेल्या दोन दिवसांपासून मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. दिंडोरी :ङ्क्तशहर व तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असून, विविध नदी-नाल्यांना पूर आला आहे. धरण क्षेत्रात दमदार पावसाच्या हजेरीने पाणी साठ्यातही वाढ होत असून, शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. पावसाने उशिरा का होईना हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या. पंधरा दिवसापासून अधून मधून रिपरिप सुरू होती.समाधानकारक पाऊस झाल्याने भाजीपाला लागवड सुरु होणार आहे