शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
3
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
4
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
5
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
7
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
8
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
9
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
10
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
11
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
12
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
13
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
14
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
15
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
16
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
17
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
18
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
19
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
20
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा

कोरोनाच्या साथीमुळे वैद्यकीय उपकरणांच्या टंचाईचा धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2020 01:50 IST

वस्तूंचा पुरवठा पूर्णत: ठप्प; सर्जिकल मास्कलाही मोठी मागणी

मुंबई : कोरोना विषाणूच्या साथीमुळे औषधांचीच नव्हेतर, नियमित वापरातील बहुतांश वैद्यकीय उपकरणांचीही तीव्र टंचाई निर्माण होण्याचा धोका निर्माण झाला आहे. या उपकरणांत डिजिटल थर्मामीटर, इन्फ्रारेड थर्मामीटर, नेब्युलायझर, रक्तदाब मापक, ग्लुकोमीटर, प्रेग्नन्सी कीट, सर्जिकल मास्क आणि सीटीस्कॅन व एमआरआय यात वापरल्या जाणाऱ्या प्रतिमा साधनांचा समावेश आहे.सूत्रांनी सांगितले की, नियमित वापरातील बहुतांश वैद्यकीय उपकरणे इलेक्ट्रॉनिक्सची आहेत. यातील काही उपकरणे तयार स्वरूपात चीनमधून आयात होतात. काही उपकरणांचे सुटे भाग चीनमधून आणून भारतात जुळणी केली जाते. चीनच्या हँगझॉऊ आणि डाँगगुआन प्रांतातून ही आयात प्रामुख्याने होते. कोरोना विषाणूच्या साथीमुळे चीनमधून होणारा या वस्तूंचा पुरवठा पूर्णत: ठप्प झाला आहे. इतक्यात तो सुरू होण्याची शक्यताही नाही. त्यामुळे या उपकरणांची मोठी टंचाई निर्माण होण्याचा धोका निर्माण झाला आहे. मार्चअखेर अथवा एप्रिलपासून पुढे या उपकरणांची निर्मिती सुट्या भागांअभावी बंद होईल, असे या क्षेत्रातील उद्योजकांनी म्हटले आहे.रुग्णाच्या शरीराला स्पर्श न करता ताप मोजण्यासाठी वापरले जाणारे इन्फ्रारेड थर्मामीटर (टेम्परेचर गन) केवळ चीनमधूनच येते. कोरोना साथ सुरू झाल्यापासून टेम्परेचर गनची तीव्र टंचाई आहे.डिजिटल थर्मामीटरचीही हीच स्थिती आहे. दक्षिण कोरिया, सिंगापूर, हाँगकाँग यासह अनेक आफ्रिकी देशांतून या तापमापींची चौकशी भारतीय उत्पादकांकडे केली जात आहे. तीन स्तरांच्या सर्जिकल मास्कलाही मोठी मागणी आहे. आणीबाणीच्या काळात भारतात टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी या वस्तूंची निर्यात रोखण्याची मागणी उद्योजकांनी सरकारकडे केली आहे.चीनमधून होते आयातसूत्रांनी सांगितले की, वैद्यकीय उपकरणांची भारतीय बाजारपेठ १५ अब्ज डॉलरची आहे. यातील ८० टक्के उपकरणे आयातीवर अवलंबून आहेत. हृदयाचे स्टेंट, हाडांचे इम्प्लान्ट, सुया, ग्लुकोमीटर, अतीव दक्षता उपकरणे, ग्लोव्हज, क्रेपी बॅण्डेज, आयव्ही सेट, ब्लड ट्रान्सफ्युजन सेट इत्यादी असंख्य उपकरणांचाही त्यात समावेश आहे. यातील केवळ १० ते २० टक्के उपकरणे भारतात बनवली जातात. त्यासाठी लागणारा कच्चा मालही चीनमधूनच येतो.

टॅग्स :corona virusकोरोना