शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

श्रीदेवी यांच्या निधनानंतर प्रसारमाध्यमांनी वापरलेल्या 'त्या' शब्दामुळे संतापले ऋषी कपूर, ट्विट करून व्यक्त केली नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2018 10:30 IST

श्रीदेवीच्या निधनाचा धक्का बसलेले अभिनेते ऋषी कपूर रविवारी संध्याकाळी प्रसार माध्यमांवर संतापले.

मुंबई- अभिनेते ऋषी कपूर यांनी अभिनेत्री श्रीदेवी यांच्याबरोबर अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. श्रीदेवी यांच्या मृत्यूनंतर ऋषी कपूर यांनी आपल्या ट्विटर प्रोफाइल फोटो बदलून फक्त काळा फोटो ठेवला आहे. त्याबरोबर त्यांनी ‘श्रीदेवी. आरआयपी’ असं पोस्ट केलं आहे. श्रीदेवीच्या निधनाचा धक्का बसलेले अभिनेते ऋषी कपूर रविवारी संध्याकाळी प्रसार माध्यमांवर संतापले. श्रीदेवी यांच्या निधनासंदर्भात बातम्या देणाऱ्या प्रसारमाध्यमांवर त्यांनी ट्विटरवरून संताप व्यक्त केला.

श्रीदेवी यांच्या निधनाची बातमी वृत्तवाहिनींवर सांगताना वापरल्या गेलेल्या शब्दावर ऋषी कपूर चिडले होते. सर्व वृत्तवाहिन्या मृतदेह आज रात्री मुंबईत आणला जाईल, अशापद्धतीची ओळ आपल्या रिपोर्टिंगमध्ये वापरत आहेत. त्यावर आक्षेप घेत ऋषी कपूर यांनी म्हंटलं की, श्रीदेवींचा अचानक मृतदेह झाला? . (निधनानंतर) अचानक तुमची ओळख पुसली जाते आणि त्यांची ओळख फक्त मृतदेह इतकीच राहते? असं ट्विट ऋषी कपूर यांनी केलं. 

ऋषी कपूर यांनी रविवारी सकाळी केलेल्या पहिल्या ट्विटमध्ये श्रीदेवींच्या मृत्युचा धक्का बसल्याचं म्हटलं. ‘एका दुख:द बातमीने आजची सकाळ झाली, धक्कादायक आहे हे. आमची सहानभूती बोनी कपूर आणि त्यांच्या दोन मुलींबरोबर आहे’, असं ट्विट त्यांनी केलं. चांदनी सिनेमातील श्रीदेवीचा एक फोटो ट्विट करत ‘यानंतर कधीच चंद्रप्रकाशातील रात्री येणार नाहीत. ‘चांदनी’ कायमची गेली.’ असं म्हंटलं.ऋषी कपूर व श्रीदेवी यांनी अनेक सिनेमांमध्ये एकत्र काम केलं आहे. चांदनी, गुरूदेव, नागीन, बंजारा, कौन सच कौन झुटा अशा सिनेमात त्यांनी एकत्र काम केलं आहे. 

 

 

टॅग्स :Srideviश्रीदेवीRishi Kapoorऋषी कपूर