शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

Rishi Kapoor passed away: ऋषी कपूर म्हणजे गुणवत्तेचा खजिना; पंतप्रधानांनी वाहिली श्रद्धांजली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2020 12:55 IST

वयाच्या ६७ व्या वर्षी ऋषी कपूर यांचं निधन; मुंबईतल्या रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

नवी दिल्ली: ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांनी वयाच्या ६७ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. रात्री उशिरा अचानक तब्येत बिघडल्यानं त्यांना मुंबईतील एचएन रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आज सकाळी त्यांनी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. ऋषी कपूर यांच्या निधनानं संपूर्ण बॉलिवूड शोकसागरात बुडालं असून चित्रपट रसिकांनादेखील धक्का बसला आहे. राजकीय नेत्यांनी ऋषी कपूर यांना श्रद्धांजली वाहिली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ऋषी कपूर यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. ऋषी कपूर चैतन्यपूर्ण आणि बहुआयामी होते. त्यांच्याकडे गुणवत्तेचा खजिना होता. आमच्यातील संवाद कायम लक्षात राहील. अगदी सोशल मीडियावरील त्यांच्यासोबत संवाददेखील स्मरणात राहील. चित्रपटाच्या आणि देशाच्या प्रगतीबद्दल त्यांना कळकळ होती. त्यांच्या निधनानं व्याकूळ झालो आहे. माझ्या सहवेदना त्यांच्या कुटुंबासोबत आणि चाहत्यांसोबत आहेत, अशा शब्दांत मोदींनी ऋषी कपूर यांना श्रद्धांजली वाहिली. ऋषी कपूर यांच्या निधनामुळे कला क्षेत्राची मोठी हानी झाल्याची भावना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली. 'भारतीय चित्रपट सृष्टीसाठी मोठे योगदान देणाऱ्या घराण्याचा वारसा असणारे, स्वतंत्र प्रतिभेचे, मनस्वी आणि निखळ अभिनेते ऋषी कपूर यांच्या जाण्याने कला क्षेत्राची हानी झाली आहे,' अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी ऋषी कपूर यांना श्रद्धांजली वाहिली. ऋषी कपूर चित्रपट सृष्टीतील २ पिढ्यांदरम्यान मार्गदर्शक दुवा होते, हा दुवा निखळला आहे. निखळ करमणूक व चित्रपट सृष्टीत आशयाच्या, तंत्रज्ञानाच्या अंगाने प्रयोग करण्यात ते यशस्वी ठरले. ते सहज सूंदर अभिनेते व तितकेच परखड, प्रांजळ व्यक्ती होते. त्यांच्या निधनाने भारतीय कलाक्षेत्राची हानी झाली आहे,' अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही ऋषी कपूर यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं. 'हा आठवडा भारतीय तित्रपटसृष्टीसाठी धक्कादायक ठरला आहे. आणखी एक दिग्गज अभिनेता आपण गमावला आहे. ऋषी कपूर उत्तम अभिनेते होते. अनेक पिढ्यांमध्ये त्यांचे चाहते होते. ते कायम स्मरणात राहतील. या कठीण काळात माझ्या सहवेदना त्यांच्या कुटुंबासोबत, मित्रांसोबत आणि चाहत्यांसोबत आहेत,' अशा शब्दांत राहुल यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. ज्येष्ठ अभिनेते ऋषी कूपर यांच्या निधनानं अतिशय दु:ख झाल्याची भावना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. ऋषी कपूर यांच्या निधनामुळे भारतीय चित्रपटसृष्टीनं एक अष्टपैलू अभिनेता गमावला आहे. कपूर कुटुंबीयांच्या दु:खात मी सहभागी आहे, असं शरद पवार यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीदेखील ऋषी कपूर यांना श्रद्धांजली अर्पण केली. 'प्रिय चिंटू यांच्या निधनानं दु:ख झालं. ते अतिशय प्रतिभावंत अभिनेते आणि उत्तम माणूस आणि मित्र होते. नीतू, रणबीर, डबू, रिमा, चिंपू आणि कपूर कुटुंबातील सगळ्यांच्या दु:खात मी सहभागी आहे. चिंटू तुमच्या आत्म्याला शांती लाभो. तुम्ही कायम स्मरणात राहाल,' अशा भावना सुप्रिया सुळेंनी व्यक्त केल्या आहेत.बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन, बॉलिवूड शोकमग्नत्यांचे चित्रपट पाहून लहानाचा मोठा झालो; Sachin Tendulkarनं वाहिली श्रद्धांजलीजेव्हा न्युयॉर्कमध्ये उपचारावेळी चिंटू कपूर आणि त्यांच्या जुन्या मित्रामध्ये रंगली होती गप्पांची मैफल

टॅग्स :Rishi Kapoorऋषी कपूरNarendra Modiनरेंद्र मोदीUddhav Thackerayउद्धव ठाकरेSharad Pawarशरद पवारRahul Gandhiराहुल गांधी