शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Rishabh Pant Health Update: कृपा करा, रिषभला बरे होऊ द्या! मंत्री, अधिकारी, चाहत्यांना कुटुंबीयांची कळकळीची विनंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2023 13:35 IST

Rishabh Pant Health Update: रिषभला केवळ शारीरिकच नव्हे तर मानसिकदृष्ट्याही विश्रांतीसाठी पुरेसा वेळ मिळणे गरजेचे आहे, असे सांगण्यात येत आहे.

Rishabh Pant Health Update: भारतीय संघाचा यष्टिरक्षक आणि फलंदाज रिषभ पंत याचा रुरकी येथे भीषण अपघात झाला. या अपघातातूनरिषभ पंत थोडक्यात बचावला. हा अपघात एवढा भीषण होता की, लक्झरी कार जळून खाक झाली. रिषभ पंतवर उपचार सुरू आहेत. रिषभ लवकरात लवकर बरा व्हावा, यासाठी सोशल मीडियावरून प्रार्थना केल्या जात आहेत. रिषभला रिकव्हर व्हायला काही महिने लागू शकतात, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. 

अपघात झाल्याची माहिती मिळताच मंत्री, अधिकारी, चाहत्यांची रिषभ पंतला भेटण्यासाठी रांग लागल्याचे सांगितले जात आहे. यातच आता कुटुंबीयांनी कळकळीची विनंती केली आहे. कृपा करून रिषभला आधी बरे होऊ द्या, असे आवाहन कुटुंबाकडून करण्यात आले आहे. रिषभ पंतला भेटण्यासाठी लोक मोठ्या संख्येने रुग्णालयात पोहोचत आहेत. यामध्ये आमदार, मंत्री, अधिकारी तसेच चित्रपट कलाकार, पंतचे चाहते यांचा समावेश आहे. मॅक्स हॉस्पिटलमध्ये पोहोचून रिषभ पंतच्या प्रकृतीची विचारपूस करत आहेत. पाहुण्यांच्या या गर्दीमुळे जखमी रिषभला विश्रांती मिळत नाही. रुग्णालयाच्या निर्धारित वेळेनंतरही रिषभला भेटणाऱ्यांची संख्या अधिक असते. त्यामुळे आता ऋषभला विश्रांतीची संधी द्यावी, असे कुटुंबीयांचे म्हणणे आहे.

रिषभ पंतला अजूनही वेदना होत आहेत

रिषभला केवळ शारीरिकच नव्हे तर मानसिकदृष्ट्याही विश्रांतीसाठी पुरेसा वेळ मिळणे गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया रिषभ पंतची देखभाल करणाऱ्या वैद्यकीय चमूतील डॉक्टरांनी दिली. तसेच अपघातात झालेल्या दुखापतींमुळे त्याला अजूनही वेदना होत असून त्याच्या भेटीसाठी गर्दी न करता त्याला विश्रांतीसाठी वेळ द्यावा, असे आवाहनही केले आहे. 

दरम्यान, पंतला रुग्णालयाच्या खासगी वॉर्डात हलवण्यात आले आहे. संसर्गाचा धोका वाढू नये म्हणून हे  पाऊल उचलण्यात आले आहे. दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे संचालक श्याम शर्मा यांनी सांगितले की, पंत सध्या बरा आहे. संसर्गाचा धोका पाहून त्यांना खासगी वॉर्डात हलवण्यात आले आहे. पंतच्या लिगामेंटच्या दुखापतीबाबत बीसीसीआय अंतिम निर्णय घेईल. बोर्डाने एका निवेदनात म्हटले आहे की, पंतच्या कपाळावर दोन कट, गुडघा, मनगट, घोटा आणि पायाचे लिगामेंट फाटले. याशिवाय पंतच्या पाठीला दुखापत झाली आहे. सध्या त्यांची प्रकृती चांगली आहे. पूर्ण बरी होईपर्यंत ते डेहराडून येथील रुग्णालयातच राहील, असेही शर्मा यांनी सांगितले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Rishabh Pantरिषभ पंतAccidentअपघात