शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
5
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
6
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
7
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
8
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
9
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
10
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
11
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
12
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
13
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
14
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
15
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
16
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
17
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
18
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
19
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
20
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

टोमॅटो महागलाय, मग वापरा टोमॅटो प्युरी आणि टोमॅटो केचअप !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2017 16:21 IST

टोमॅटोची जेवणातील चव राखण्यासाठी टोमॅटो केचअप, टोमॅटो प्युरी आणि सॉस इत्यादी उत्पादनांचा वापर करता येऊ शकतो.

नवी दिल्ली, दि. 1 - गेल्या काही दिवसांपासून टोमॅटोचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे गृहिणींच्या स्वयंपाकगृहातून टोमॅटो हद्दपार झालाय. जेवणात महत्त्वाचं स्थान असलेल्या टोमॅटोच्या चवीपासून अनेकांना वंचित राहावं लागतंय. मात्र टोमॅटो महागला तरी तुम्ही घाबरू नका, टोमॅटोची जेवणातील चव राखण्यासाठी टोमॅटो केचअप, टोमॅटो प्युरी आणि सॉस इत्यादी उत्पादनांचा वापर करता येऊ शकतो.तसेच टोमॅटो महागल्यामुळे या उत्पादनांची बाजारातील मागणीही वाढली असून, 40 ते 45 टक्क्यांवर गेली आहे. टोमॅटो महागल्यामुळे जवळपास 70 टक्के मध्यमवर्गीयांच्या महिन्याच्या खर्चाचा ताळमेळ बिघडलाय, अशी माहिती असोचेमने दिली आहे. टोमॅटो प्युरी आणि टोमॅटो केचअपची वाढती मागणी पाहता दुकानदारांनीही त्याचा साठा वाढवला आहे. जास्त करून शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात टोमॅटोचा वापर केला जात होता. त्यामुळेच हॉटेल आणि रेस्टारंटमध्ये जाणा-या खवय्यांना पदार्थांत टोमॅटोची चव मिळावी, म्हणूनही केचअपचा वापर केला जातोय. त्याप्रमाणेच काही गृहिणींनी टोमॅटोचा वापर कमी केलाय. टोमॅटोची गरज नसलेल्या भाज्या म्हणजे भेंडी, भोपळा, पालेभाज्या करण्यावर गृहिणींनी जास्त भर दिला आहे. मुंबई, कोलकाता, चेन्नई, हैदराबादसारख्या शहरांसह वाढलेल्या किमतीचा मोठा परिणाम हा राजधानी दिल्लीत व त्यानंतर अहमदाबादेत दिसला. असोचेमचे महासचिव डी. एस. रावत म्हणाले होते, ‘पाहणीत कमी उत्पन्न गटातील 70 टक्के कुटुंबांनी टोमॅटोचा वापर बंद करून खर्च टाळला आहे. टोमॅटोचे भाव वाढल्यामुळे टोमॅटोची चटणी, केचअप, आले व लसणाची पेस्ट आदी तयार पदार्थांच्या मागणीत 40-45 टक्के वाढ झाली आहे.’दिल्लीसह अनेक बाजारांत टोमॅटोनं शंभरी पार केली आहे. देशाच्या प्रमुख शहरांत महिन्याभरापूर्वी 30 रुपये किलोनं मिळणारा टोमॅटो 100पार गेला आहे.