शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
2
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
3
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
4
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
5
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
6
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
7
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
8
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
9
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
10
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
11
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
12
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
13
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
14
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
15
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
16
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
17
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
18
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
19
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
20
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?

प्रियंकांचा उदय हा राहुल गांधींचा पराभव नव्हे, सचिन पायलट यांनी सुनावले

By aparna.velankar | Updated: January 24, 2019 15:46 IST

कॉंग्रेस पक्षातला प्रियंकांचा सक्रीय सहभाग हा येत्या तीन महिन्यातला सर्वात मोठा ‘गेम चेंजर’ठरेल,

ठळक मुद्देप्रियंकांचा उदय हा राहुल यांचा पराभव असल्याची फोल समीकरणे कुणीही मांडू नयेत कॉंग्रेस पक्षातला प्रियंकांचा सक्रीय सहभाग हा येत्या तीन महिन्यातला सर्वात मोठा ‘गेम चेंजर’ठरेलयोगी आदित्यनाथ आणि प्रियांका गांधी या दोघांंमध्ये निवड करण्याची वेळ येईल; तेव्हा सुजाण नागरिकांचा कल कोणाकडे असेल हे ओळखण्यासाठी राजकीय पंडित असण्याची गरज नाही

- अपर्णा वेलणकरडिग्गी पैलेस, जयपूर -  ‘‘प्रियंका गांधी यांची पक्ष संघटनेतली नेमणूक राहुल गांधी यांच्या सहीने झाली आहे; त्यामुळे प्रियंकांचा उदय हा राहुल यांचा पराभव असल्याची फोल समीकरणे कुणीही मांडू नयेत’ असे सुनावत राजस्थानचे नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी कॉंग्रेस पक्षातला प्रियंकांचा सक्रीय सहभाग हा येत्या तीन महिन्यातला सर्वात मोठा ‘गेम चेंजर’ठरेल, अशी खात्री व्यक्त केली आहे.जागतिक साहित्य-विश्वात मानाचे स्थान प्राप्त केलेल्या ‘जयपूर लिटरेचर फेस्टिव्हल’च्या उदघाटनाच्या दिवशी एका विशेष सत्रात ते बोलत होते.‘‘भारतीय मतदारांचा चेहरा, त्यांच्या अपेक्षा आणि आक्षेप हे सारेच आता बदलले आहे. घराणेशाहीचे जुने आरोप, उध्दट राष्ट्रवादाचा क्रूर चेहेरा आणि कंठाळी राजकीय चर्चांच्या कलकलाटापलीकडे जाऊन वर्तमानासाठी निवड करण्याचे नवे निकष देशातल्या मतदारांनी तयार केले आहेत. योगी आदित्यनाथ आणि प्रियांका गांधी या दोघांंमध्ये निवड करण्याची वेळ येईल; तेव्हा सुजाण नागरिकांचा कल कोणाकडे असेल हे ओळखण्यासाठी राजकीय पंडित असण्याची गरज नाही’ असेही पायलट यांनी सांगितले.प्रियंका गांधी यांच्या प्रवेशामुळे उत्तर प्रदेशात सपा-बसपाच्या युतीला फटका बसून भाजपाच्या विरोधातली मते फुटतील आणि विरोधकांच्या एकीतली हवा निघून जाईल, हे गृहितक पायलट यांनी स्पष्टपणे फेटाळले. प्रियांका यांच्यामुळे देशातील राजकारणाला एक सकारात्मक वळण मिळेल, अशी खात्रीही त्यांनी व्यक्त केली.डिग्गी पैलेसच्या चारबाग हिरवळीवर सुप्रसिध्द पत्रकार श्रीनिवासन जैन यांनी पायलट यांची मुलाखत घेतली, तेव्हा या तरुण नेत्याने माध्यमांनाही चार शब्द सुनावताना मागेपुढे पाहिले नाही. देशापुढे अनेक गंभीर प्रश्न आहेत, पण निवडणुकीच्या तोंडावर उभ्या असलेल्या सर्वात मोठ्या लोकशाही व्यवस्थेतली माध्यमे मात्र कोणी जानवे घातले, कोणाचे गोत्र कोणते, कोण मंदिरात गेले आणि कोण मशिदीत असल्या प्रश्नांवर तासनतासाच्या फुटकळ चर्चा लढवण्यात गर्क आहेत. यात सगळ्यांचाच वेळ फुकट चालला आहे आणि पत्रकारितेच्या नावाखाली डोकेदुखी बोकाळली आहे, असे सचिन पायलट यांनी ठासून सांगीतले; तेव्हा रसिकांनी टाळ्यांचा गजर केला. या मुलाखतीला जगभरातून आलेल्या तरुण साहित्य रसिकांची मोठी गर्दी होती, हे विशेष! 

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियांका गांधीRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसPoliticsराजकारण