शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

लवकरच जीएसटी दर कमी होणार; मोदी सरकारकडून 'अच्छे दिनां'चे संकेत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2018 17:03 IST

सरकारला महसूल वाढल्यानं सर्वसामान्यांना दिलासा मिळण्याची शक्यता

नवी दिल्ली : येत्या काही महिन्यांमध्ये जीएसटी दर कमी केले जाऊ शकतात, असे संकेत मोदी सरकारकडून देण्यात आले आहेत. जीएसटीच्या माध्यमातून एप्रिलमध्ये सरकारला 1 लाख कोटींपेक्षा अधिक उत्पन्न मिळालं आहे. सरकारला जीएसटीतून जास्त उत्पन्न मिळाल्यानं ललकरच जीएसटी दर कमी केले जाऊ शकतात. 'सरकारचा महसूल वाढत असल्यास, त्याचा फायदा ग्राहकांनादेखील दिला जाईल,' असं हंगामी अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी शनिवारी म्हटलं. मोदी सरकारनं मंगळवारी जीएसटीतून मिळालेल्या उत्पन्नाचे आकडे जाहीर केले. एप्रिलमध्ये सरकारला जीएसटीतून 1 लाख 3 हजार 458 कोटी रुपयांचं उत्पन्न मिळालं आहे. सरकारला 1 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न मिळाल्यानं लवकरच जीएसटी दर कमी केले जाण्याची शक्यता आहे. पीयूष गोयल यांनी शनिवारी याबद्दलचे संकेतही दिले. 'सरकारचा महसूल वाढल्यास त्याचा लाभ ग्राहकांना दिला जाईल. महसूल वाढल्यानं वित्तीय तूट कमी होईल. त्यामुळे विकास प्रकल्प, पायाभूत सोयीसुविधांसाठी अधिक रक्कम खर्च करता येईल,' असं गोयल म्हणाले. जीएसटीमुळे विकास दर वाढल्याचं गोयल यांनी सांगितलं. 'विविध प्रकारचे कर, उपकर हटवल्यानं विकास दरात वाढ झाली आहे. जीएसटीच्या माध्यमातून मिळणारं यंदाच्या वर्षातील उत्पन्न 13 लाख कोटी रुपये असू शकतं. ई-वे बिलचा डेटा आल्यावर आणखी दिलासा मिळू शकतो,' असं गोयल म्हणाले. जुलै 2017 नंतर सरकारनं 320 वस्तूंवरील कर कमी केले होते. यातील बहुतांश वस्तूंवर 28 टक्के कर होता. याशिवाय लवकरच सिमेंट आणि पेंटवरील करदेखील कमी केला जाण्याची शक्यता आहे. मोदी सरकारचे माजी आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यन यांनीही 28 टक्क्यांचा टप्पा हटवण्याची गरज व्यक्त केली होती.  

टॅग्स :GSTजीएसटीpiyush goyalपीयुष गोयलNarendra Modiनरेंद्र मोदीArun Jaitleyअरूण जेटली