शहरं
Join us  
Trending Stories
1
टीम इंडियातील 'प्रिन्स'च्या गळ्यात कॅप्टन्सीची माळ; गंभीर-गिल जोडीसह कसोटीत नवे पर्व
2
बंदूक नाही पण निलेश चव्हाणचा लॅपटॉप पोलिसांच्या हाती, आत सापडले… 
3
एक कोटी ८४ लाखांचे प्रकरण दाबवण्यासाठी गृह खात्याचे गुप्त आदेश; अनिल गोटेंचा आरोप
4
IND vs ENG : इंग्लंड दौऱ्यासाठी कठोर मेहनत; १० किलो वजनही कमी केलं! पण... सरफराजला ते प्रकरण भोवलं?
5
धक्कादायक! ४० हजारांसाठी देशाशी गद्दारी; गुजरातच्या कच्छमधून पाकिस्तानी गुप्तहेराला अटक
6
इंटरनेटची सुविधा नाही, फोनही लागत नाही; भुयारी मेट्रोचा प्रवास ठरतोय त्रासदायक!
7
Varlin Panwar : वडील आर्मी ऑफिसर, लेकही होती IAF स्क्वाड्रन लीडर; आता प्रसिद्ध बॉलिवूड स्टार्सना देतेय ट्रेनिंग
8
वडिलांची झाली हत्या, मारेकऱ्यांना शिक्षा देण्यासाठी 'तो' झाला IPS; फी भरण्यासाठी विकलं धान्य
9
IND vs ENG : तो चांगला खेळतोय; पण...श्रेयस अय्यर कसोटी संघात का नाही? अजित आगरकर यांनी असं दिलं उत्तर
10
Rohit Pawar: समविचारी पक्ष सोबत आले तर ठिक, नाही तर...; रोहित पवार स्पष्टच बोलले
11
बिपाशाच का ही? अभिनेत्रीचा व्हिडिओ पाहून नेटकरी शॉक; एकेकाळची 'फिटनेस दिवा' आता...
12
Covid-19: चिंता वाढली! कळव्यात २१ वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू
13
लग्नादरम्यान भर मंडपातून वराचं अपहरण, समोर आलं धक्कादायक कारण, कुटुंबीयांच्या तोंडचं पळालं पाणी  
14
४ ग्रह, ४ राजयोग: १० राशींवर लक्ष्मी प्रसन्न, भरघोस भरभराट; बक्कळ पैसा, बंपर लाभ, वरदान काळ!
15
धक्कादायक! गाण्याचा आवाज कमी करायला सांगितल्याने पती चिडला, पत्नीवर फेकले टॉयलेट क्लीनर
16
प्रेमाच्या जाळ्यात अडकवून बनवले तरुणींचे अश्लील व्हिडीओ; ७ आरोपींची पोलिसांनी काढली धिंड
17
ऑपरेशन सिंदूर: सैन्याने IPS अधिकाऱ्याचा सन्मान का केला? पाकिस्तानचा रहीम यार खान एअरबेस जवळच होता...
18
Somavati Amavasya 2025: पितरांच्या फोटोची जागा तर अयोग्य नाही? सोमवती अमवास्येला करा बदल!
19
Nuclear Weapon : ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानच्या अण्वस्त्रांचं नुकसान झालं? पाकचं परराष्ट्र मंत्रालय म्हणतंय... 
20
"काळजी करू नका…’’ पुंछमध्ये पाकिस्तानच्या गोळीबारात नुकसान झेलणाऱ्या पीडितांना राहुल गांधींनी दिला धीर

आधी उसळी, नंतर आपटी

By admin | Updated: January 6, 2015 02:00 IST

भारतीय शेअर बाजारांनी सोमवारी तेजी आणि मंदीचा अनोखा संगम पाहिला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आधी उसळून १ महिन्याच्या उच्चांकावर गेला होता.

मुंबई : भारतीय शेअर बाजारांनी सोमवारी तेजी आणि मंदीचा अनोखा संगम पाहिला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आधी उसळून १ महिन्याच्या उच्चांकावर गेला होता. नंतर मात्र तो गडगडला आणि ४६ अंकांच्या घसरणीसह बंद झाला. निफ्टीनेही १७ अंकांची घसरण नोंदविली. एचडीएफसी, इन्फोसिस आणि एअरटेल यांसारख्या ब्ल्यूचिप कंपन्यांत नफावसुली झाल्यामुळे बाजाराला फटका बसला. सकाळी बाजार उघडला तेव्हा उत्साहवर्धक वातावरण होते. ३0 कंपन्यांच्या समभागांचा समावेश असलेला बीएसई सेन्सेक्स तेजीने उघडला. नंतर तो २८ हजारांची पातळी ओलांडून २८,0६४.४९ अंकांपर्यंत वर चढला. १७५ अंकांची वाढ सेन्सेक्सने मिळविली होती; मात्र याच टप्प्यावर नफा वसुलीचे सत्र सुरू झाले. सेन्सेक्स धडधडत खाली आला. एका क्षणी तो २७,७८६.८५ अंकांपर्यंत खाली गेला होता. सत्र अखेरीस तो २७,८४२.३२ अंकांवर बंद झाला. ४५.५८ अंकांची अथवा 0.१६ टक्क्यांची घसरण त्याला सोसावी लागली. गेल्या ६ सत्रांत सेन्सेक्सने ६७९ अंकांची वाढ नोंदविली होती. ही वाढ २.५0 टक्के होती. या तेजीला आता ब्रेक लागला आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या सीएनएक्स निफ्टीची सकाळची सुरुवातही तेजीने झाली. एका क्षणी तो ८,४४५.६0 अंकांपर्यंत वर गेला. त्यानंतर नफावसुलीचे सत्र सुरू झाले. दिवसअखेरीस १७.0५ अंकांची अथवा 0.२0 टक्क्यांची घसरण नोंदवून निफ्टी ८,३७८.४0 अंकांवर बंद झाला. आयटी आणि बँकिंंग क्षेत्रात नफावसुलीचा जोर दिसून आला. आशियाई बाजारातील नरमाईमुळे प्रामुख्याने ही नफा वसुली झाली. हाँगकाँग, जपान, दक्षिण कोरिया, सिंगापूर आणि तैवान येथील बाजार 0.२४ टक्के ते १.२६ टक्के कोसळले. शांघाय कंपोजिट मात्र ३.५८ टक्क्यांनी वाढला.युरोपीय बाजारात संमिश्र कल दिसून आला. फ्रान्स, जर्मनी येथील बाजार 0.0३ टक्के ते 0.0४ टक्के वाढले. ब्रिटनचा एफटीएसई मात्र 0.0४ टक्क्यांनी घसरला. सेन्सेक्समधील ३0 पैकी १५ कंपन्यांचे समभाग वाढले. १४ कंपन्यांचे समभाग घसरले. (प्रतिनिधी)च्सेन्सेक्समधील सर्वाधिक फटका बसलेल्या कंपन्यांत डॉ. रेड्डीज लॅब, भारती एअरटेल, हिंदाल्को, एचडीएफसी, टीसीएस, सेसा स्टरलाईट, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि एचडीएफसी यांचा समावेश आहे. च्मारुती, टाटा मोटर्स, टाटा स्टील, लार्सन अँड टुब्रो आणि ओएनजीसी यांचे समभाग वाढले. निर्देशांकापैकी टेक निर्देशांक सर्वाधिक १.0७ टक्के घसरला. आयटी, मेटल, आॅटो, कन्झ्युमर ड्युरेबल हे निर्देशांकही घसरले.च्बाजाराची एकूण व्याप्ती सकारात्मक राहिली. १,५४५ कंपन्यांचे समभाग वाढले. १,४२0 कंपन्यांचे समभाग घसरले. १२४ कंपन्यांचे समभाग स्थिर राहिले. बाजाराची एकूण उलाढाल २,७२९.१७ कोटी रुपये राहिली. शुक्रवारी ती २,९९२.८0 कोटी रुपये होती. शुक्रवारी विदेशी गुंतवणूकदारांनी २५९.८२ कोटी रुपयांचे शेअर खरेदी केल्याचे हंगामी आकड्यांवरून दिसून आले.