शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

Fact Check : तीरथ सिंह रावत यांच्या मुलीनेच घातली फाटकी जीन्स?; जाणून घ्या, 'त्या' फोटोमागचं नेमकं सत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2021 09:58 IST

Uttarkhand chief minister Tirath Singh Rawat comment on women ripped jeans : "आजकाल महिला फाटलेल्या जीन्स घालून फिरतात, हे सगळं बरोबर आहे का? हे कसले संस्कार आहेत" असं तीरथ सिंह रावत यांनी म्हटलं होतं.

नवी दिल्ली - उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत (Tirath Singh Rawat) यांच्यावर सध्या वादग्रस्त विधानामुळे जोरदार टीका होत आहे. एका कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री रावत यांनी महिला वापरत असलेल्या जीन्सवर विधान केलं असून यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. रावत आपल्या एका विधानामुळे खूपच चर्चेत आले आहेत. "आजकाल महिला फाटलेल्या जीन्स घालून फिरतात, हे सगळं बरोबर आहे का? हे कसले संस्कार आहेत" असं तीरथ सिंह रावत यांनी म्हटलं होतं. यानंतर सर्वांनी यावरून निशाणा साधत हल्लाबोल केला आहे. याच दरम्यान सोशल मीडियावर एक फोटो जोरदार व्हायरल होत आहे. तीरथ सिंह रावत यांच्या मुलीनेच फाटकी जीन्स घातल्याचं म्हटलं जात आहे. 

मुख्यमंत्र्याच्या मुलीनेच फाटलेली जीन्स परिधान केल्याचा दावा व्हायरल होणाऱ्या फोटोमधून करण्यात येत आहे. 'चक दे' (Check De) फेम अभिनेत्री चित्राशी रावतचा (Actress Chitrashi Rawat) चा तो फोटो असून सध्या तो तुफान व्हायरल होतं आहे. ज्यामध्ये तिने फाटलेली जीन्स परिधान केली आहे. हा फोटो व्हायरल होतं असतानाच चित्राशी रावत या वादग्रस्त विधान करणारे उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांच्या कन्या आहेत असं म्हटलं जात आहे. मात्र आता स्वत: अभिनेत्री चित्राशी रावतने याबाबत मोठा खुलासा केला आहे. 

"सध्या सोशल मीडियावर माझा एक फोटो खूप व्हायरल होतं आहे. ज्यामध्ये मी एक रिप्ड जीन्स परिधान केली आहे. हा फोटो व्हायरल होताना मी उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांची मुलगी आहे असा दावा केला जात आहे. पण हे पूर्णपणे खोटं आहे. हे खरं आहे की माझ्या वडिलांचं नावही तीर्थ सिंह रावत आहे. त्यामुळे बऱ्याच लोकांचा गोंधळा उडाला आहे" अशी माहिती अभिनेत्री चित्राशी रावतने आजतकला प्रतिक्रिया देताना दिली आहे. सर्वच स्तरातून रावत यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली. महिला नेत्यांनी यावरून निशाणा साधत टीकास्त्र सोडलं आहे. मात्र टीका झाल्यानंतरही रावत यांनी आपली भूमिका कायम ठेवली आहे. 

"...तरीही फाटक्या जीन्स वापरण्याला माझा विरोध"; जोरदार टीकेनंतरही तीरथ सिंह रावत आपल्या विधानावर ठाम

तीरथ सिंह रावत यांनी फाटक्या जीन्सबाबत केलेल्या वादग्रस्त विधानावर आता पुन्हा एकदा आपली प्रतिक्रिया दिली आहे. "आपला महिलांनी जीन्स वापरण्याला विरोध नाही पण तरीही फाटक्या जीन्स वापरण्याला विरोध आहेच" असं रावत यांनी म्हटलं आहे. सर्वच स्तरातून टीका होत असताना रावत यांना त्यांच्या विधानाबद्दल विचारणा करण्यात आली. त्यावर माध्यमांशी बोलताना त्यांनी आपला महिलांनी फाटक्या जीन्स वापरण्याला विरोध कायम असल्याचं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. ट्विटरवर सध्या RippedJeans हा हॅशटॅग जोरदार ट्रेंड होत आहे.

"आजकाल महिला फाटलेल्या जीन्स घालून फिरतात, हे कसले संस्कार आहेत?"; उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांचं विधान

बाल हक्क संरक्षण आयोगाच्या वतीने एका कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. याच दरम्यान बोलताना मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी हे विधान केलं होतं. मुलांवर होणाऱ्या संस्कारला आईवडील जबाबदार असतात असं देखील ते म्हणाले आहेत. मुख्यमंत्री रावत यांनी त्यांचा प्रवासातील एक अनुभवही सांगितला. "एकदा मी विमानातून प्रवास करत होतो. त्यावेळी मी बघितलं की, एक महिला आपल्या दोन मुलांना घेऊन जवळच बसलेली होती. त्या महिलेने फाटलेली जीन्स घातलेली होती. मी त्या महिलेला विचारलं की कुठे जायचं? यावर ती महिला म्हणाली दिल्लीला."

"महिलेचा पती जेएनयूमध्ये प्राध्यापक आहे आणि ती महिला स्वयंसेवी संस्था चालवते. माझ्या मनात विचार आला, जी महिला एनजीओ चालवते आणि फाटलेली जीन्स घालून फिरते. अशी महिला समाजात कोणत्या संस्कृतीचा प्रसार करत असेल. जेव्हा आम्ही शाळेत होतो, तेव्हा असं नव्हतं" असंही रावत यांनी म्हटलं आहे. तसेच तरुणांमध्येही व्यसन वाढत चाललं आहे. नशेबरोबरच आपल्याला सर्व विकृतींपासून मुलांना दूर ठेवून संस्कारी बनवावं लागेल. तसेच पाश्चिमात्य संस्कृतीच्या प्रभावापासून दूर राहावं लागेल असं देखील रावत यांनी म्हटलं आहे. काही दिवसांवपूर्वी रावत यांनी पंतप्रधान मोदींची तुलना ही  प्रभू रामासोबत केली होती. 

टॅग्स :uttara-kannada-pcउत्तरा कन्नडIndiaभारतWomenमहिला