शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
5
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
6
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
7
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
8
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
9
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
10
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
11
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
12
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
13
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
14
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
15
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
16
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
17
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
18
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
19
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!

Delhi Violence: दंगेखोरांनी छातीवर रोखली पिस्तूल, तरीही मागे हटला नाही पोलीस कॉन्स्टेबल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2020 11:11 IST

Delhi Violence News : राजधानी दिल्लीत सीएए आणि एनआरसीविरोधात सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान, एका दंगेखोराने थेट पोलिसावर पिस्तूल रोखले.

ठळक मुद्देराजधानी दिल्लीत सीएए आणि एनआरसीविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला  हिंसक वळणहिसाचारात आतापर्यंत पोलिसांसह पाच जणांचा मृत्यू

नवी दिल्ली - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारत दौऱ्यावर आले असतानाच राजधानी दिल्लीत सीएए आणि एनआरसीविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला  हिंसक वळण लागले आहे. या हिसाचारात आतापर्यंत पोलिसांसह पाच जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, सोमवारी भडकलेल्या दंगलीची काही छायाचित्रे आता व्हायरल होऊ लागली आहेत.  दंगल आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांकडून सातत्याने प्रयत्न करत होते. त्याचदरम्यान, एका दंगेखोराने थेट पोलिसावर पिस्तूल रोखले. मात्र एवढ्या तणावाच्या परिस्थितीतही संबंधित पोलीस कॉन्स्टेबल एक पाऊलही मागे हटला नाही. दिल्लीतील मौजपूर नहर रोडवरील सेठ भगवानदास स्कूलसमोर दंगेखोरांनी दुकानांना आग लावली. गाद्यांच्या दुकानांना आग लावल्यावर हा दंगेखोर जमाव जाफराबादच्या दिशेने घोंडाचौककडे निघाला. त्या दरम्यान, दोन्हीकडून दगडफेक सुरू होती. यादरम्यान, पोलिसांनी दंगेखोरांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र एका तरुणाने थेट पिस्तूल बाहेर काढले. एका पोलिस अधिकाऱ्याने त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र तो थांबला नाही. त्याने पोलिसांवर पिस्तूल रोखून धरले होते. मात्र संबंधित पोलीस कॉन्स्टेबल अजिबात मागे हटला नाही. 

नंतर त्याने  चार ते पाचवेळा गोळीबार केला. दरम्यान, काहीवेळाने हाच तरुण भिंतीआड लपून गोळीबार करत असल्याचे दिसून आले. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. या तरुणाचे नाव मोहम्मद शाहरूख असून तो जाफराबाजमध्ये राहणारा असल्याचे निष्पन्न झाले. सोमवारी दुपारी ३.३० च्या सुमारास जाफराबादमधील जमाव घोंडा चौकाच्या दिशेने गोळीबार करत जात होता. या जमावाने मोठ्या प्रमाणात जाळपोळ केली. दरम्यान, पोलिस जमावाला रोखण्यासाठी पुढे सरसावल्यावर एक तरुण पिस्तूल उंचावत समोर आला. तो सतत गोळीबार करत होता. 

दरम्यान, दंगेखोरांनी मोठ्या प्रमाणावर गोळीबार केला. अनेक दंगेखोर पिस्तूल घेऊन फिरत होते. काही ठिकाणी लोक घरातूनही गोळीबार करत होते, असा दावा पोलिसांनी केला.  

संबंधित बातम्या

'राजधानी को बचाना ही होगा', हिंसाचारानंतर दिल्लीत शाळा बंद अन् परीक्षाही रद्द

CAA Protest : सीएए विरोधी आंदोलनाला हिंसक वळण, 37 पोलीस गंभीर जखमी 

CAA Protest : सीएए विरोधी आंदोलनात आज पुन्हा दगडफेक, हेड कॉन्स्टेबलचा मृत्यू

टॅग्स :delhiदिल्लीPoliceपोलिस