शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

चीनच्या कब्जातून बाहेर येण्याची हीच आहे वेळ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2020 04:53 IST

भारतीय स्टेशनरी, कपडे, खेळणी घ्या; देशवासीयांना त्यातून हमखास मिळेल रोजगार

- सचिन लुंगसे मुंबई : मोबाइल, इलेक्ट्रिक वस्तू, दिवाणखाने सजवणारी झुंबरे, लाइट फिटिंग्ज, लहान मुलांची खेळणी... देवदेवतांच्या चिनी छापाच्या मूर्ती यासारख्या प्रत्येक क्षेत्र व्यापणाऱ्या साहित्यातून भारतातील प्रत्येक बाजारपेठेला चिनी ड्रॅगनचा विळखा पडला आहे. ही उलाढाल तब्बल १० हजार कोटींची आहे.वापरा आणि फेकून द्या, या छापाच्या वस्तू आणि वर्गाच्या खिशाला परवडणाऱ्या किंमती यामुळे भारतीयांना त्याची भुरळ पडत असली तरी त्याद्वारे चिनी मालाने ७२ ते ७५ टक्के बाजारपेठ व्यापली आहे. चीनच्या कब्जातून बाहेर पडण्यासाठी सरकार, विविध धोरणे व्यापारी यांच्याबरोबरच ग्राहकांनीही पुढाकार घ्यायला हवा. ते केल्यास ड्रॅगनच्या विळख्यातून बाहेर पडणे शक्य होईल.चिनी मालावर ग्राहकांनीच बहिष्कार घालावा. तरच हा विळखा सैल होईल, असा व्यापारी संघटनांचा दावा आहे. फेडरेशन ऑफ महाराष्ट्र स्टेशनरी मॅन्युफॅक्चरर्स अ‍ॅन्ड ट्रेडर्स असोएशनचे अध्यक्ष पारस शाह यांनी सांगितले की, स्टेशनरीतील पेपर इंडस्ट्रीत चीनचा वाटा ५ टक्के आहे. पण पेन-बॉलपेनच्या दहा टक्के बाजारपेठेवर चीनचे वर्चस्व आहे. स्टिकर्स, आर्ट्स आणि क्राफ्टची ७५ टक्के बाजारपेठ चीनच्या कब्जात आहे. शालेय साहित्यातील रबर, पट्टी, पेन्सिलसारख्या वस्तू, आॅफिस स्टेशनरीच्या ५० टक्के मालावर चीनचे वर्चस्व आहे. चीनने भारतीय खेळण्यांची बाजारपेठ पूर्णत: नष्ट केली आहे. स्कूल बॅग, लॅपटॉप बॅगपैकी ५० टक्के उत्पादने चीनमधून येतात.चीनने बाजारपेठेचा मोठा हिस्सा व्यापला आहे. मोबाइलपासून इलेक्ट्रिक साहित्यापर्यंत तो पसरला आहे. महात्मा गांधी यांनी मिठाचा सत्याग्रह केला तो मीठ उचलून. त्याचपद्धतीने चिनी वस्तू खरेदी करणार नाही, यापद्धतीने प्रतीकात्मकता दाखवत तुम्ही एक संदेश देऊ शकता. यातून लगेच चिनी बाजारपेठेला हादरा देता येणार नाही. पण वेगळे व कायमस्वरूपी उपाय शोधायला हवेत, हे निश्चित.- शिरीष देशपांडे, प्रमुख, मुंबई ग्राहक पंचायत

टॅग्स :chinaचीन