शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

सहाव्या महिन्यातही कायदेशीर गर्भपाताचा अधिकार; अपवादात्मक मुदतवाढीस मंत्रिमंडळाची मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2020 06:10 IST

यासाठी १९७१च्या ‘मेडिकल टर्मिनेशन आॅफ प्रेग्नन्सी’ कायद्यात दुरुस्तीसाठी संसदेच्या आगामी अधिवेशनात विधेयक मांडले जाईल.

नवी दिल्ली : अपवादात्मक स्थितीत महिलांना गर्भारपणाच्या सहाव्या महिन्याच्या अखेरपर्यंतही कायदेशीर गर्भपात करूनघेणे शक्य व्हावे, यासाठी सध्याच्या कायद्यात दुरुस्ती करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी मंजुरी दिली.यासाठी १९७१च्या ‘मेडिकल टर्मिनेशन आॅफ प्रेग्नन्सी’ कायद्यात दुरुस्तीसाठी संसदेच्या आगामी अधिवेशनात विधेयक मांडले जाईल.सध्या कायदेशीर गर्भपातासाठी गर्भारपणाच्या २० आठवड्यांची (पाच महिने) सरसकट मुदत आहे. यालाठराविक परिस्थितीतील महिलांच्या बाबतीत अपवाद करून त्यांना गर्भारपणाच्या २४ आठवड्यांपर्यंत (सहा महिने)गर्भपात करण्याची मुभा देण्याचे दुरुस्ती विधेयकात प्रस्तावित आहे. यात बलात्कारपीडित महिला, जवळच्या नातेवाईकाने केलेल्या लैंगिक अत्याचारांमुळे गरोदर राहिलेल्या महिला, अल्पवयीन मुली व दिव्यांग महिला इत्यादींचा समावेश आहे. कायद्याच्या नियमावलीतया अपवादांची नेमकी व्याख्या केली जाईल.मात्र जन्माला येणाऱ्या मुलात मोठे व्यंग असू शकतो, असा निष्कर्ष मेडिकल बोर्डाने वैद्यकीय चाचण्यांवरून काढल्यास वाढीव मुदतीत गर्भपात करून घेता येणार नाही, असे सरकारने स्पष्ट केले. गर्भपात करणे अपरिहार्य आहे की नाही यावर मत देण्यासाठी नेमायच्या वैद्यकीय बोर्डाची रचना कशी असावी व त्यांच्या कामाची नेमकी कक्षा काय असेल, हे नियमावलीत ठरवून दिले जाईल.सध्याच्या कायद्यानुसार २० आठवड्यांपर्यंतचा गर्भपात एकाडॉक्टरच्या सल्ल्याने केला जाऊ शकतो. मात्र सुधारित कायद्यानुसार यापुढील २४ आठवड्यांपर्यंतच्या गर्भपातासाठी दोन डॉक्टरांचा सल्ला व सहमती बंधनकारक असेल. याशिवाय जिचा गर्भपात केलागेला त्या महिलेचे नाव व अन्यमाहिती कोणत्याही स्वरूपात उघडकरण्यास नव्या कायद्यानुसार पूर्ण प्रतिबंध असेल.महिलांना मिळेल न्यायकेंद्रीय माहितीमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले की, कायद्यातील ही दुरुस्ती पुरोगामी असून, त्यामुळे महिलांच्या जननहक्काच्या कक्षा रुंदावून त्यांना आपल्या शरीरावर अधिक नियंत्रण ठेवणे शक्य होईल. शिवाय गुन्हेगारीमुळे गरोदरपण लादल्या जाणाºया महिलांना परिपूर्णतेने न्याय मिळू शकेल. यामुळे नाईलाजाने २० आठवड्यांत गर्भपात करता न येणाºया महिलांना त्यानंतरही सुरक्षित आणि कायदेशीर गर्भपात करण्याचा मार्ग मोकळा होईल.

टॅग्स :Abortionगर्भपात