शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

बंदरांतील शुल्कनिश्चितीचे अधिकार खासगी विकासकांकडे; संसदेत विधेयक मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2021 04:20 IST

लोकसभेने हे विधेयक आधीच मंजूर केले आहे. आता त्यावर राष्ट्रपतींची मंजुरी शिल्लक आहे.

उरण : शुल्क निश्चितीच्या अधिकारात खासगी गुंतवणूकदार - विकासकांना वाव देणारे, बंदरांच्या प्रशासनाला अधिक अधिकार देणारे आणि खासगीकरणाला संधी उपलब्ध करून देण्यासाठी महत्त्वाच्या मानल्या गेलेल्या प्रमुख बंदर प्राधिकरण विधेयकाला राज्यसभेने बुधवारी मंजुरी दिली. लोकसभेने हे विधेयक आधीच मंजूर केले आहे. आता त्यावर राष्ट्रपतींची मंजुरी शिल्लक आहे.बंदरे, नौकानयन मंत्री मनसुख मांडवीय यांनी हे विधेयक मांडताना यातून बंदरांच्या खासगीकरणाला उत्तेजन द्यायचे नसून तेथील प्रशासनाला व्यापक अधिकार देण्याचे उद्दिष्ट असल्याचे सांगितले. बंदरांमध्ये पूर्वी असलेल्या ट्रॅफिक अ‍ॅथॉरिटीपेक्षा आता पोर्ट अ‍ॅथॉरिटीला व्यापक अधिकार मिळतील. यात बंदरांतील विविध सेवांचे शुल्क ठरवण्याच्या अधिकाराचा समावेश असेल आणि पीपीपी तत्त्वावर बंदरांचा विकास करताना ज्या खासगी गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केली आहे, त्यांचाही शुल्कनिश्चितीत सहभाग असेल. हे विधेयक १९६३ च्या बंदर प्राधिकरण विधेयकाची जागा घेईल. या विधेयकात आच्छादित आणि अप्रचलित विभागांची संख्या कमी करून  त्यांची संख्या १४४ वरून ७६ वर आणण्यात आली आहे. देशातील १२ बंदरांच्या कामात यामुळे आमूलाग्र बदल होतील. त्यात नवी मुंबईतील जवाहरलाल नेहरू बंदराचा समावेश आहे. सुधारित विधेयकाची ठळक वैशिष्ट्येनव्या विधेयकात बंदर प्राधिकरणाच्या मंडळाची सुलभ रचना प्रस्तावित आहे. यात पूर्वीच्या ट्रॅफिक ॲथॉरिटीचे अधिकार पोर्ट ॲथॉरिटीकडे जातील. हे बंदर असलेल्या राज्याचे सरकार, रेल्वे, संरक्षण, सीमा शुल्क, महसूल विभाग या मंडळाचे सदस्य असतील. तसेच  चार स्वतंत्र सदस्यांतील एक केंद्र सरकारचा प्रतिनिधी, दोन कामगारांचे प्रतिनिधी असतील. बंदरांशी संबंधित सर्व पूरक सुविधांच्या विस्ताराची जबाबदारीही या सदस्यांकडे असेल. बंदरांमधील कर्मचाऱ्यांच्या पेन्शनसह वेतनभत्ते व सेवाशर्तींचे संरक्षण करण्याची तरतूद आहे.