शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 14:02 IST

Air India After Plane Crash : या विमानांत असे अनेक प्रवासी होते, ज्यांना दुसरे विमान पकडून पुढे जायचे होते. परंतू, एअर इंडियाच्या सावळ्या गोंधळामुळे या प्रवाशांचेही हाल झाले आहेत.  

टाटाच्या ताब्यात जाताच एअर इंडिया सुधारेल अशी अपेक्षा सरकारलाच नाही तर जनतेलाही होती. परंतू, आता दोन-तीन वर्षे होत आली तरी काही केल्या एअर इंडिया सुधरायचे नाव घेताना दिसत नाहीय. अहमदाबाद अपघातानंतर डीजीसीएने एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांना हटविण्याचे आदेश दिलेले असताना आता निष्काळजीपणाचा कहर करणारे वृत्त येत आहे. 

एअर इंडियाची दोन विमाने वेगवेगळ्या विमानतळांवरून बिहारची राजधानी पटनाला लगेज न घेताच आली आहेत. एअर इंडियाने कारणही हास्यास्पद दिले आहे. एकाच दिवशी असा प्रकार एकाच विमानतळासाठी घडल्याने विमानतळावर उतरताच प्रवाशांचा गोंधळ सुरु झाला. यावेळी एअर इंडियाने पटना विमानतळाची धावपट्टी लहान आहे आणि पाऊस पडत होता. त्यामुळे जड सामान येऊ शकले नाही, असे कारण दिले आहे. 

त्याहून कहर म्हणजे आज एअर इंडियाचे कोणतेही विमान पटनाला येणार नाहीय. उद्या सकाळी ८ वाजेपर्यंत हे सामान पटनाला पोहोचेल असेही सांगण्यात आले आहे. म्हणजे ज्या प्रवाशांची पटनामध्ये सोय नाही त्या प्रवाशांना घरी न जाता पटन्यातच सामानाची वाट पाहत थांबावे लागणार आहे. बंगळुरूवरून आलेल्या IX2936 या विमानाने १८० प्रवाशांचे साहित्य बंगळुरुलाच ठेवले आहे. फक्त प्रवाशांना आणून विमानतळावर सोडले आहे. तसेच चेन्नईवरून आलेल्या XI1634 या विमानाने देखील प्रवाशांचे साहित्य मागेच ठेवले आहे. 

वजन जास्त झाले म्हणून प्रवाशांच्या बॅगा आणल्या नाहीत, असे कारण एअर इंडियाने दिले आहे. प्रवासी विमानतळावर उतरताच लगेजची वाट पाहत होते. परंतू ते आलेच नाही. यामुळे गोंधळ सुरु झाला. यावेळी एअर इंडियाने प्रवाशांना तुमचे लगेजच आणलेले नाही असे सांगितले. प्रवासी वाद घालू लागल्यानंतर एअर इंडियाने सामान प्रवाशांच्या थेट घरी पोहोचविण्याचे आश्वासन दिले आहे.  

या विमानांत असे अनेक प्रवासी होते, ज्यांना दुसरे विमान पकडून पुढे जायचे होते. परंतू, एअर इंडियाच्या सावळ्या गोंधळामुळे या प्रवाशांचेही हाल झाले आहेत.  

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाPlane Crashविमान दुर्घटनाBiharबिहार