शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
3
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
4
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
5
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
6
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
7
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
8
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
9
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
10
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
11
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
12
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
13
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
14
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
15
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
16
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
17
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
18
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
19
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
20
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
Daily Top 2Weekly Top 5

कोलकत्याच्या 'निर्भया'ला मिळाला न्याय; आरजी कर प्रकरणातील नराधमाला जन्मठेपेची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 15:46 IST

RG Kar Rape-Murder Case: महिला डॉक्टर बलात्कार-हत्या प्रकरणातील आरोपी संजय रॉयला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

RG Kar Rape-Murder Case: पश्चिम बंगालच्या सियालदह न्यायालयाने आज(20 जानेवारी) कोलकाता आरजी कर बलात्कार-हत्या प्रकरणातील दोषी संजय रॉय (Sanjay Roy) ला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. यासोबतच न्यायालयाने त्याला 50 हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. शिक्षेची घोषणा करताना अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश अनिर्बन दास म्हणाले की, हे दुर्मिळ प्रकरण नाही, त्यामुळे ते दोषीला जन्मठेपेची शिक्षा देत आहेत. 

भारतीय न्याय संहितेच्या कलम 64, 66 आणि 103 (1) अंतर्गत संजय रॉय दोषी आढळला आहे. या कलमांतर्गत गुन्हेगाराला जास्तीत जास्त फाशी किंवा जन्मठेपेची शिक्षा देण्याची तरतूद आहे. मात्र न्यायाधीशांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. दरम्यान, संजय रॉयला जन्मठेपेची शिक्षा सुनावल्यानंतर न्यायालयाने राज्य सरकारला पीडितेच्या कुटुंबीयांना 17 लाख रुपयांची भरपाई देण्याचे निर्देश दिले आहेत. यावर पीडितेच्या पालकांनी भरपाई घेण्यास नकार दिला. 

पीडितेच्या पालकांनी केलेली फाशीची मागणी पीडितेच्या पालकांकडून उपस्थित राहिलेल्या वकिलानेही जास्तीत जास्त शिक्षेची मागणी केली होती. संजय रॉय हा सिव्हिक व्हॉलंटियर असल्याने हॉस्पिटलच्या सुरक्षेची जबाबदारी त्याच्याकडे होती. पण त्याने सुरक्षा करण्याऐवजी पीडितेसोबत जघन्य गुन्हा केला आहे, त्यामुळे त्याला जास्तीत जास्त(फाशी) झाली पाहिजे, असा युक्तिवाद वकिलांनी केला. पण, न्यायालयाने सुनावणीअंती आरोपीला जन्मठेप सुनावली आहे.

सुमारे 162 दिवसांनी निर्णय2024 मध्ये 8-9 ऑगस्टच्या रात्री घडलेल्या या घटनेच्या सुमारे 162 दिवसांनंतर न्यायालयाने शनिवारी आपला निर्णय दिला आणि संजय रॉय यांना दोषी ठरवले. या प्रकरणाची सुनावणी सुमारे 57 दिवस चालली. यापूर्वी या प्रकरणाचा तपास कोलकाता पोलिस करत होते. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आले. सीबीआयने 13 ऑगस्ट रोजी या प्रकरणाचा तपास हाती घेतला. सीबीआयने 120 हून अधिक साक्षीदारांचे जबाब नोंदवले. सुमारे दोन महिने या प्रकरणी कॅमेरा ट्रायल सुरू होती.

त्याला फाशी द्या ; आरोपीच्या आईची प्रतिक्रियासंबंधित प्रकरणातील आरोपी संजय रॉयला त्याच्या कृत्याची शिक्षा मिळाली पाहिजे, अशी प्रतिक्रिया रविवारी आरोपीच्या आईने दिली. मुलाला फाशीची शिक्षा झाली, तरी माझा त्याला आक्षेप नसेल. कारण त्याचा गुन्हा सिद्ध झाला आहे. मी एकट्याने रडेन, माझे नशीब समजून सर्व गोष्टींचा स्वीकार करेन. एक महिला व तीन मुलींची आई असल्याने मी त्या पीडितेच्या मातेचे दु:ख समजू शकते, असे नमूद करत तिने आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.  

 

टॅग्स :Courtन्यायालयCrime Newsगुन्हेगारीdoctorडॉक्टर