(सुधारित) लाचखोर तहसीलदारास पाच दिवसांची कोठडी
By admin | Updated: August 2, 2015 22:55 IST
अमळनेर (जि. जळगाव) : तीस हजाराची लाच घेतल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या अमळनेरच्या तहसीलदार आशा गांगुर्डे व लिपीक प्रकाश जोगी यांना न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.सलीमखाँ मेवाची यांचे मुरूमाचे ट्रॅक्टर २८ जुलैला पकडण्यात आले होते. ते सोडविण्यासाठी मेवाची यांच्याकडून ३० हजार रूपयांची लाच घेताना गांगुर्डे यांना शनिवारी सायंकाळी अटक ...
(सुधारित) लाचखोर तहसीलदारास पाच दिवसांची कोठडी
अमळनेर (जि. जळगाव) : तीस हजाराची लाच घेतल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या अमळनेरच्या तहसीलदार आशा गांगुर्डे व लिपीक प्रकाश जोगी यांना न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.सलीमखाँ मेवाची यांचे मुरूमाचे ट्रॅक्टर २८ जुलैला पकडण्यात आले होते. ते सोडविण्यासाठी मेवाची यांच्याकडून ३० हजार रूपयांची लाच घेताना गांगुर्डे यांना शनिवारी सायंकाळी अटक करण्यात आली होती. (प्रतिनिधी)