शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटनं चिंता वाढवली; पंतप्रधान मोदी मोठा निर्णय घेणार? अलर्ट जारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2021 16:35 IST

आफ्रिकेत कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचा धुमाकूळ; जगभरातील देशांची झोप उडाली

नवी दिल्ली: आफ्रिकेत कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळून आला आहे. ओमिक्रॉन असं नाव देण्यात आलेल्या नवा व्हेरिएंट अतिशय वेगानं पसरत असल्याचं दिसून आलं. त्यामुळे जगभरातील देशांची झोप उडाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आजच अधिकाऱ्यांची बैठक घेत परिस्थितीचा आढावा घेतला. आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीवरील उठवण्यात आलेल्या निर्बंधांचा आढावा घेण्याचे आदेश मोदींनी दिले. त्यामुळे आता परदेशातून भारतात दाखल होत असलेल्या नागरिकांवर सरकारचं बारीक लक्ष असेल.

नव्या व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर मोदींनी आज वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. परदेशांमधून येणाऱ्या नागरिकांवर लक्ष ठेवण्याची गरज मोदींनी बोलून दाखवली. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं 'हाय रिस्क' म्हणून घोषित केलेल्या देशांमधून येणाऱ्यांची कोविड चाचणी घेण्याच्या सूचना त्यांनी केल्या. कोविड प्रतिबंधात्मक प्रोटोकॉल पाळले जायला हवेत, असंही मोदी म्हणाले. दरम्यान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नव्या व्हेरिएंटचा प्रभाव अधिक असलेल्या देशांमधून येणारी विमानं रोखण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे.

पंतप्रधान मोदींनी बोलावलेल्या बैठकीला कॅबिनेट सचिव, आरोग्य सचिव, कोविड टास्क फोर्सचे प्रमुख उपस्थित होते. त्यांच्याकडून मोदींनी देशातील स्थितीचा आढावा घेतला. आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांची संख्या १५ डिसेंबरपासून कोरोना आधीच्या स्थितीत नेण्याची माहिती नागरी उड्डाण मंत्रालयानं दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ही बैठक झाली.

'ऍट रिस्क' देशांमधून येणाऱ्या विमानांवर बंदी?केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दक्षिण आफ्रिका, बोटस्वाना, इस्रायल आणि हाँगकाँगचा समावेश ऍट रिस्क देशांच्या यादीत करण्यात आला आहे. नव्या व्हेरिएंटचा फैलाव झालेल्या देशांमधून येणाऱ्या विमानांवर बंदी घालण्याची मागणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री डॉ. राजेश टोपेंनी केली आहे. देशात कोरोनाची पहिली लाट आली. त्यावेळी वेळेत आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक बंदी न केल्याबद्दल मोदी सरकारवर टीका झाली होती.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदी