शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

उलट गणती थांबवण्यात आली आणि...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2019 04:22 IST

चंद्रावर यान सोडून भारत सोमवारी नवा विश्वविक्रम स्थापन करणार होता.

- निनाद देशमुख श्रीहरीकोटा : चंद्रावर यान सोडून भारत सोमवारी नवा विश्वविक्रम स्थापन करणार होता. त्यामुळेच या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी हजारो नजरा श्रीहरिकोटा येथील केंद्रावरील यानावर खिळल्या होत्या. उलट गणतीची टिकटिक शास्त्रांच्या हृदयाची धडधड वाढवत होती. तर माध्यमांचे प्रतिनिधी देखील डोळ््यात प्राण आणून प्रत्येक क्षण टिपण्यासाठी आतूर झाले होते. प्रत्यक्षात राष्ट्रपती या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार म्हणून उपस्थित असल्याने शास्त्रज्ञांमध्येही एक उत्साह आणि जोश होता. अनेकांचा ऊर अभिमानाने भरून आला असतानाच अचानक उलट गणती थांबवण्यात आली आणि सर्वांचाच हिरमोड झाला.इस्रोच्या सतीश धवन अंतराळ केंद्रातील वातावरण क्षणार्धात बदलून गेले. रात्री १२ वाजता नियंत्रण कक्षातून पहिली घोषणा झाली की यानाच्या सर्व गोष्टी नियंत्रणात असून सर्व सुरळीत आहे. रात्री एक वाजून ४० मिनिटांनी मोहीम प्रमुखांनी दुसरी घोषणा केली. काही कारणामुळे मोहीम थोड्या वेळासाठी थांबवण्यात आली. मात्र, सर्व ठीक होईल या आशेने सगळे उड्डाणाची वाट पाहत होते. प्रक्षेपणासाठी ५६ मिनिटे २४ सेकंद बाकी असताना तिसरी घोषणा झाली. प्रक्षेपात तांत्रिक बिघाड झाल्याने उड्डाण स्थगित करण्यात आले आहे. येत्या काळात सर्व त्रुटी दूर करून पुन्हा शास्त्रज्ञ मोहिमेसाठी सज्ज होतील, असा विश्वास शास्त्रज्ञांनी बोलून दाखवला. ‘चांद्रयान- २’ मोहिमेला याआधी दोन वेळा स्थगित करावे लागले होते. त्यामुळे यावेळी काहीही करून मोहीम यशस्वी होईलच, असा आत्मविश्वास शास्त्रज्ञांनाही होता. पण... मोहीम स्थगित झाल्याने निराशा झाली.>माध्यम समन्वयकांना पत्रकारांचा गराडाउड्डाण स्थगित झाल्याने त्यामागची कारणे शोधण्यासाठी माध्यम प्रतिनिधींची लगबग सुरू होती. सतीश धवन अंतराळ संशोधन केंद्रात काही वेळापूर्वी ऐतिहासिक क्षणाची सर्व माहिती दिली जात होती. मात्र, उड्डाण रद्द झाल्यावर कोणतीच माहिती दिली जात नव्हती. इस्रोच्या अधिकाऱ्यांनी माध्यम प्रतिनिधींशी न बोलता उड्डाण स्थगित झाल्याचे ट्विट केले. त्यामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण होते. इस्रोचे माध्यम समन्वयक गुरुप्रसाद यांना पत्रकारांनी गराडा घातला होता.केंद्राच्या प्रवेश द्वाराजवळ जीएसएलव्ही आणि पीएसएलव्हीच्या प्रतिकृती ठेवण्यात आल्या आहेत. नागरिकांनी हताश न होता या प्रतिकृतीसोबत छायाचित्र तसेच सेल्फी घेतली.

टॅग्स :Chandrayaan 2चांद्रयान-2